महिलांसाठी व आरोग्यासाठी कॅनरा बँकेची नवीन योजना

कर्करोगासारख्या समस्येवर कंपनी कर्ज पुरवठा करणार महिलांसाठीही आकर्षक ऑफर

    04-Apr-2024
Total Views |

Canara Bank
 
 
मुंबई: कॅनरा बँकेने आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आरोग्य केंद्रित कर्ज व महिलांसाठी सेविंग अकाऊंटवर नवीन योजना आणल्या आहेत. बुधवारी कॅनरा बँकेने इस्पितळातील खर्चासाठी आरोग्याच्या समस्येसाठी व उपचारासाठी कर्ज योजना आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे.
 
कॅनरा बँकेने महिलांसाठीही 'एजेंल ' खात्याची घोषणा केली आहे. या खात्यामार्फत कॅन्सर व तत्सम आरोग्याच्या दृष्टीने खाजगी कर्ज यौजना आणली आहे. यासाठी कॅनरा रेडी कॅश, मुदत ठेवीच्या माय मनी कॅनरा बदल्यात कर्ज अशा योजना बँकेने ग्राहकांसाठी आणल्या आहेत.
 
कॅनरा बँकेने मेडीअसिस्ट हेल्थकेअर सर्विसेस व बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स यांच्याबरोबर सामंजस्य करार (MoU) केला आहे. यावेळी बोलताना बँकेकडून आरोग्याच्या दृष्टीने परवडणारे प्रोडक्ट आम्ही ग्राहकांच्या दिमतीला आणले असल्याचे यावेळी सुतोवाच केले आहे.'
 
रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे सीईओ राजेश बन्सल यांनी या कार्यक्रमात कॅनरा SHG e-MONEY नावाचा डिजिटल SHG उपक्रम लाँच केला, ज्यामुळे कॅनरा बँक ही RBIH च्या सहकार्याने SHG ला अखंड दारात डिजिटल सेवा देणारी पहिली बँक बनली आहे.