अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

    04-Apr-2024
Total Views |
 
Archana Patil
 
मुंबई : राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची धामधूम सुरु आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही सुरु आहेत. अशीच एक बातमी आता राजकीय वर्तुळातून समोर आली आहे. गुरुवारी अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अर्चना पाटील या भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यासोबतच पक्षप्रवेशानंतर अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी मिळणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे.
 
ला नव्हता. मात्र, आता अर्चना पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांना धाराशिवमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे आता धाराशिवमध्ये अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर अशी लढत राहण्याची शक्यता आहे.