'ही' सरकारी कंपनीही वेगात ! आतापर्यंत सर्वाधिक २०३३ कोटींचा लाभांश जाहीर केला

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २०३३ कोटींचा लाभांश

    04-Apr-2024
Total Views |

Power Finance Corporation
 
 
मुंबई: सरकारी मालकीची कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी घोषित केली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २०३३ कोटींचा लाभांश (Dividend) समभागधारकांना घोषित केला आहे. कंपनीने तीन टप्यात भागभांडवल धारकांना हा लाभांश दिल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
 
पहिल्यांदा ५५४ कोटी, मग ८३२ कोटी त्यानंतर ६४७ कोटी या तीन टप्यात लाभांशांचे वाटप केले आहे असे कंपनीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. कंपनीने आपल्या जाहीरनाम्यात ' कंपनीने आतापर्यंत सर्वाधिक २०३३ कोटींचा लाभांश भारत सरकारसाठी घोषित केला आहे. हा अंतरिम लाभांश आरटीजीएस मार्फत देण्याचा सल्ला ऊर्जामंत्री आर के सिंह यांना देण्यात आल्याचे परमिंदर चोप्रा यांनी या निवेदनात म्हटले आहे '
 
आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कंपनीच्या भागभांडवलधारकांना कंपनीने ३६३० कोटींचा लाभांश आतापर्यंत देण्यात आल्याचे सांगितले आहे.