रिझर्व्ह बँकेने ' या ' दोन अहवालांचे अनावरण केले

यातील माहिती पतधोरण आखताना कामी येणार

    30-Apr-2024
Total Views |

RBI
 

मुंबई: रिझर्व्ह बँकेने सोमवारी ' Inflations Expectations Survey of Households' व 'Consumer Confidence Survey 'या दोन अहवालाचे अनावरण केले आहे.या अहवालातून दोन महिन्यातील पतधोरणाचा आढावा मिळणार आहे.
 
Inflation Expectations Survey of Households' या अहवालात महागाई, किंमतीचे चढ उतार याबद्दल माहिती मिळणार आहे. यामध्ये १९ शहराचा समावेश असणार आहे.गुवाहाटी, हैद्राबाद, कोलकाता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, तिरूवनंतपुरम या शहरांचा समावेश आहे.
 
या अहवालात विविध घरातील बाजारातील किंमतीत बदल होण्याबाबत मत जाणून घेतली जाणार आहेत.एखाद्या वस्तूची किंमत किंवा विशिष्ट वस्तुंची किंमत यांचा आढावा घेत त्याबद्दल जनतेची मते जाणून घेतली जाणार आहेत.
 
The Consumer Confidence Survey मध्ये एकूण बाजारातील परिस्थिती,अर्थव्यवस्थेबाबत त्यांची मतं मतांतरे,बाजारात उद्योजकता,बाजारात वस्तुंच्या किंमती, रोजगार निर्मिती, कुटुबांची उत्पन्न व खर्च करण्याची पद्धत या विविध पातळ्यांवर आढावा घेतला जाणार आहे. यामध्येही भोपाळ, बंगलोर, दिल्ली, चंदीगढ , चेन्नई, भुवनेश्वर अशा विविध शहरांतील जनतेचा आढावा घेतला जाणार आहे.
 
यातील निष्कर्ष पुढील पतधोरण आखताना काही येण्याची शक्यता आहे.