स्विगीला १८७ चे आईस्क्रीम पडले ५१८७ रुपयांना काय आहे प्रकरण जाणून घ्या….

ग्राहकांच्या बाजूने न्यायालयाचा निकाल स्विगीला कोर्टाचा दणका !

    30-Apr-2024
Total Views |

Swiggy
 
 
मुंबई: एका बंगलोरच्या नागरिकांनी स्विगीविरुद्ध ग्राहक संरक्षण मंचाचे दार ठोठावले होते. त्याबद्दल ग्राहक निवारण न्यायालयाने स्विगीला ५००० रुपयांचा दंड ठोठावला आहे.एका ग्राहकाने स्विगीतून १८७ रुपयांचे आईस्क्रीम मागवले होते.परंतु प्रत्यक्षात त्या ग्राहकाला ते आईस्क्रीम डिलिव्हर केले गेले नाही व ऑर्डर केल्याचे नोटिफिकेशन मध्ये दर्शवले होते.यावरून ग्राहकाने निवारण मंचाकडे तक्रार केली असता स्विगीला १८७ रुपयांच्या आईस्क्रीम बदल्यात ५००० रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
 
बार व बेंच यांनी दिलेल्या अहवालानुसार, एका ग्राहकाने नटी डेथ आईस्क्रीम हे क्रीम स्टोन आईस्क्रीममधून स्विगीमार्फत मागवले होते व १८७ रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले होते. प्रत्यक्ष ग्राहकाला मिळाले नसले तरी 'डिलिव्हर' असल्याचे दर्शविण्यात आले होते.कस्टमर केअरला तक्रार करून देखील स्विगीने पैसै परतावा न दिल्याने ग्राहकाने अखेर ग्राहक निवारण मंचाकडे तक्रार केली.
 
सुनावणीच्या आधी, स्विगीने असा युक्तिवाद केला की तो केवळ ग्राहक आणि रेस्टॉरंट्समधील मध्यस्थ आहे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ते संरक्षित आहे.ॲपने पुढे असा आरोप केला की डिलिव्हरी एजंटने चूक केली होती आणि विशेषत: ॲपवर 'वितरित' असे चिन्हांकित केले असल्यास ते प्रत्येक ऑर्डरची डिलिव्हरी सत्यापित करण्याच्या स्थितीत नव्हते '.
 
मात्र ग्राहक न्यायालयाने स्विगीला 'वाईट सेवा व अनैतिक व्यवसाय पद्धत' अशा शब्दांत ताशेरे ओढत स्विगीला ग्राहकाला परतावा देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात स्विगी आपली जबाबदारी झटकू शकत नाही असे म्हटले आहे.न्यायालय पुढे म्हणाले की माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत सूट माहितीच्या प्रसारापुरती मर्यादित आहे आणि वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर लागू नाही.' यामुळे अखेर न्यायालयाने स्विगीविरोधात निर्णय दिला होता.
 
बंगलोर जिल्हा ग्राहक निवारण योगाने स्विगीला मूळ रक्कम १८७ रुपये व ३००० रुपये नुकसानभरपाई व २००० रुपये खटल्याचा खर्च असे एकूण ५१८७ रुपये नुकसानभरपाई म्हणून ग्राहकाला देण्याचे आदेश दिले आहेत.