शेअर बाजार अपडेट: बाजारात मोठी वाढ! सेन्सेक्स ३४२.६४ अंशाने वाढत ७५०१५.८७ व निफ्टी ११२.९० अंशाने वाढत २२७५६.३० पातळीवर

बँक निर्देशांकात वाढ चालूच ! ऑटो, रियल्टी, फायनाशियल सर्विसेस समभागात मोठी वाढ आयटी समभागात घसरण

    30-Apr-2024
Total Views |
 
Stock Market
 
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळीही मोठी तेजी पहायला मिळत आहे. शेअर बाजार निर्देशांकातील चढता आलेख कायम राहिला आहे. सकाळी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे.सेन्सेक्स ३४२.६४ अंशाने वाढत ७५०१५.८७ पातळीवर व निफ्टी ११२.९० अंशाने वाढत २२७५६.३० पातळीवर पोहोचला आहे.बँक निर्देशांकातही वाढ कायम आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात १३४.८८ अंशाने व निफ्टी बँक निर्देशांकात १८८.५० अंशाने वाढ झाली आहे.आजही सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांचा बाजारातील विश्वास वाढलेला दिसतो आहे.
 
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.६५ व ०.४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे निफ्टीत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५० व ०.१८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये आयटी,मेटल समभाग वगळता इतर समभागात मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ ऑटो (२.२४%) फायनांशियल सर्विसस २५/५०, रियल्टी (१.३६%) समभागात (Shares) वाढ झाली आहे.
 
बीएसईत एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंटस, टाटा मोटर्स, मारूती सुझुकी, पॉवर ग्रीड, बजाज फायनान्स,रिलायन्स, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक,अल्ट्राटेक सिमेंट,एचयुएल,आयटीसी,नेस्ले,एसबीआय या समभागात झाली आहे. तर टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी,जेएसडब्लू स्टील, एचसीएलटेक, टीसीएस, इन्फोसिस भारती एअरटेल, विप्रो, सनफार्मा,कोटक महिंद्रा या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत एम अँड एम, हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक,डिवीज,आयशर मोटर्स, एशियन पेंटस,टाटा मोटर्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, पॉवर ग्रीड,बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स,श्रीराम फायनान्स,अदानी पोर्टस,आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक,टाटा कनज्यूमर प्रोडक्ट या समभागात वाढ झाली आहे.टेक महिंद्रा,एनटीपीसी,जेएसडब्लू स्टील,हिंदाल्को, एचसीएलटेक,ग्रासीम, इन्फोसिस, टीसीएस,डॉ रेड्डीज,अदानी एंटरप्राईज,सनफार्मा, विप्रो,ब्रिटानिया,कोटक महिंद्रा या समभागात घसरण झाली आहे.