'रामायण' चित्रपटाचे संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन

30 Apr 2024 11:39:41
'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा 'रामायण' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार
 

ramayan  
 
मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. यात प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेत रणबीर कपूर आणि साई पल्लवी दिसणार आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांचा लूक समोर आला होता. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक महत्वाची माहिती समोर येत असून त्याचं कनेक्शन थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्यासोबत आहे.
 
‘रामायण’ चित्रपटातील रणबीर आणि साई पल्लवीचा लूक अतिशय मनमोहक आहे. रणबीर लांब केस, कानात कुंडले आणि बाजू बंद अशा लूकमध्ये दिसत असून लाई पल्लवी भरजरी साडी, सुंदर असे दागिने यात दिसत आहे. तर सांगायचा मुद्दा हा की त्यांचा हा लूक रिंपल आणि हरप्रीत या डिझायनर जोडीने डिझाईन केला असून त्यांनीच संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी या चित्रपटाचेही कॉस्च्युम डिझाईन केले आहेत.
 
काही दिवसांपुर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रिंपल आणि हरप्रीत म्हणाले होते की, त्यांनीच 'रामायण'साठी कपडे, लूक डिझाईन केला आहे. भारतीय संस्कृतीत रामायणाचं मोठं महत्व असून त्यांनी अतिशय मेहनतीने काम केले आहे. तर भन्साळी यांच्याही ‘हिरामंडी’साठी देखील त्यांनी काम केले असून ही वेब सीरीज नेटफ्लिक्सवर १ मे पासून प्रदर्शित होणार आहे.
Powered By Sangraha 9.0