Q4 Results: पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडने तिमाही निकाल जाहीर कंपनीच्या निव्वळ नफ्यात ८३.६ टक्क्यांनी वाढ मार्च ३१, २०२४ पर्यंत कंपनीला ३३१.७ कोटींचा निव्वळ नफा

निव्वळ व्याज उत्पन्न ४०८ कोटींवर

    30-Apr-2024
Total Views |

Abhay Bhutada
 
 
 
मुंबई: पुनावाला फिनकॉर्प लिमिटेडने या विना बँकिग वित्तीय संस्था (NBFC) ने आपला चौथ्या तिमाही निकाल जाहीर केला. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर करोत्तर नफा (Profit After Tax) १०२७ कोटींचा झाला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत हा नफा ८३ टक्क्यांनी वाढला आहे.या तिमाहीत कंपनीला ३३२ कोटींचा करोत्तर नफा झाला असून तिमाही बेसिसवर (QoQ) कंपनीच्या करोत्तर नफ्यात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
कंपनींच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ८३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च ३१, २०२४ पर्यंत कंपनीला ३३१.७ कोटींचा निव्वळ नफा (Net Profit) झाला आहे. मागील वर्षी कंपनीला १८०.७ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
 
कंपनींच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income) मध्ये ५७ टक्क्यांनी वाढ झाली असून उत्पन्नात ६४०.५ कोटींवर पोहोचले आहे. मागील तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न ४०८ कोटींवर पोहोचले होते.निव्वळ व्याज मार्जिनमध्ये (NIM) तिमाही बेसिसवरून ११.३ टक्क्यांवरुन ११.६ टक्क्यांवर वाढ झाली आहे.कंपनींच्या ऑपरेटिंग नफ्यात (Operating Profit) मध्ये चौथ्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर ९३ टक्क्यांनी वाढ झाल्याने नफा ४०९ कोटीवर पोहोचला आहे.तिमाही बेसिसवर ऑपरेटिंग नफ्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
मागील डिसेंबर तिमाहीत कंपनीला १.३३ टक्क्यांनी असलेला एनपीए ( Non Performing Assets) मध्ये घट होत मार्चअखेरीस १.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्रॉस एनपीए २७५ कोटींवरुन कमी होत २६८ कोटींवर तिमाही बेसिसवर पोहोचला आहे. डिसेंबर तिमाहीतील १४५ कोटी निव्वळ एनपीएच्या तुलनेत घसरण होत १३६ कोटींवर निव्वळ एनपीए पोहोचला आहे.
 
कंपनीचे एयुएम (Asset Under Management) म्हणजेच व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्तेत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५५ टक्क्यांनी वाढ होत २५००३ कोटींवर पोहोचले आहे. तिमाही बेसिसवर कंपनीच्या एयुएममध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने केलेल्या तिमाहीतील वितरणात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ५२ टक्क्यांनी वाढ होत वितरण ९६८८ कोटींवर पोहोचले आहे. तिमाही बेसिसवर कंपनीच्या वितरणात (Disbursement) मध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
निकालावर भाष्य करताना, पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक अभय भुतडा म्हणाले,“ पूनावाला फिनकॉर्पच्या एनबीएफसी स्पेसने आजवर पाहिलेल्या सर्वात मोठ्या परिवर्तनाचे नेतृत्व करताना मला गेल्या ३ वर्षांच्या प्रवासाबद्दल आनंद आणि अभिमान वाटतो.आमची कठोरता आणि अंमलबजावणी उत्कृष्टतेने हे सुनिश्चित केले आहे की सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी दिली आहे .परिणामी AUM (व्यवस्थापना अंतर्गत मालमत्ता) ₹ 25,000 कोटी आणि PAT (करोत्तर नफा) ने १००० कोटी ओलांडण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.आमची विभेदित रणनीती आणि अथक अंमलबजावणी सर्व व्यवसाय मेट्रिक्सवर प्रतिबिंबित होते आणि आम्हाला कर्ज देण्याच्या क्षेत्रात एक विचारशील नेते बनवले आहे.'