इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने तिमाही निकाल जाहीर केला कंपनीच्या नफ्यात ४९ टक्क्यांनी घट

30 Apr 2024 19:17:26

Indian Oil
 
 
मुंबई: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने मंगळवारी आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर ४९.९६ टक्यांच्या निव्वळ नफा झाला आहे. कंपनीचा निव्वळ नफा ५१४८.८७ कोटींवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षातील तिमाहीत कंपनीला १०२८९.८२ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात यंदा घट झाली आहे.
 
मागिल तिमाहीत कंपनीला ९०२९.५६ कोटींचा नफा झाल्यामुळे मागील तिमाहीतील तुलनेत नफ्यात ४२.९७ टक्क्यांनी घट झाली आहे.कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue From Operations) मध्ये ३.६ टक्क्यांनी घट होत कंपनीला २२३६४९.८५ कोटींचा महसूल चौथ्या तिमाहीत मिळाला आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत हा महसूल २३०७११.५६ कोटी होता. तिमाही बेसिसवर (QoQ) कंपनीला २२६८९२.०८ कोटींचा महसूल मिळाला आहे.
 
संपूर्ण वर्षात कंपनीला निव्वळ नफ्यात ३२६.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे निव्वळ नफ्यात ४१७२९.६९ पर्यंत वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला ९७९२.१२ निव्वळ नफा झाला होता.कंपनीच्या उत्पन्नात ७.३८ टक्क्यांनी घट होत ८८५०७८.३० कोटीवर उत्पन्न पोहोचले आहे.
 
कंपनींच्या एकूण उत्पन्न चौथ्या तिमाहीत २२५१०३.३७ कोटीवर पोहोचले आहे.मागील वर्षाच्या तिमाहीत २३१९८९६० कोटींच्या तुलनेत २.९६ टक्क्यांनी घसरले आहे.तिमाही बेसिसवर उत्पन्न १.३३ टक्क्यांनी घसरला होता.
 
कंपनीने प्रति समभाग ७ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.
 
Powered By Sangraha 9.0