काँग्रेसचे 'पंजा' चिन्ह जाणार? मनसेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

30 Apr 2024 14:48:47
 
Congress
 
मुंबई : निवडणूकीच्या काळात काँग्रेसच्या पंजा चिन्हाबाबत वाद निर्माण झाला आहे. मनसेने पंजा चिन्हावर आक्षेप घेतला आहे. पंजा चिन्हामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसचे पंजा चिन्ह जाणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हावर आक्षेप घेत पोलिस कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरील बोधचिन्हात पंजा असल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे पंजा चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोधचिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
हे वाचलंत का? -  "उद्धव ठाकरे नैराश्याच्या गर्तेत! त्यांची वायफळ बडबड पक्षातील नेत्यांनाच नकोशी!"
 
याशिवाय निवडणूकीच्या काळात अनेक पोलिस कर्मचारी काम करतात. त्यांच्या गणवेशावर पंजा असल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे एकतर तो काढून टाका किंवा काँग्रेसचे चिन्ह बदलण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसचे पंजा चिन्ह जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0