"उद्धव ठाकरे नैराश्याच्या गर्तेत! त्यांची वायफळ बडबड पक्षातील नेत्यांनाच नकोशी!"

30 Apr 2024 14:14:20

Thackeray 
 
मुंबई : उद्धव ठाकरे हे नैराश्याच्या गर्तेत गेले असून त्यांची वायफळ बडबड आता त्यांच्या नेत्यांनासुद्धा नकोशी झाली आहे, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
 
 
 
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्राचे महानालायक उद्धव ठाकरे यांचा आदरणीय मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल बोलताना पुन्हा तोल गेला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या नावानं कितीही शिव्याशाप दिले तरी जनता जनार्दनाचे आशीर्वाद देवेंद्रजींसोबत आहेत. पण उद्धव ठाकरेंचा वाचाळपणा काही थांबायचं नाव घेत नाही."
 
हे वाचलंत का? -  नाशिकमध्ये एसटी बसचा भीषण अपघात! टायर फुटल्याने ट्रकची धडक
 
"अडीच वर्षे घरात बसून काढली, बोलण्यासाठी एक विकासकामही केलं नाही. मग लोकांसमोर गेल्यावर अशी मुक्ताफळे उधळण्याची वेळ येते. उद्धव ठाकरे हे आता नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत. त्यांची ही वायफळ बडबड त्यांच्या पक्षातील उमेदवारांना आणि नेत्यांना सुद्धा नकोशी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी आता एक लक्षात ठेवावं की, तुम्ही मोदीजी आणि देवेंद्रजींबद्दल कितीही वायफळ बडबड करा ४ जून रोजी जनता तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा ठेवणार नाही," असे ते म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0