बाबा रामदेव यांना धक्का १४ उत्पादनांवर बंदी व या उत्पादनाचा परवाना रद्द!

दिशाभूल जाहिराती प्रकरणी उत्तराखंड सरकारची मोठी कारवाई

    30-Apr-2024
Total Views |

BABA Randev
 

मुंबई: सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. निमित्त आहे बेजबाबदारपणे केलेल्या वक्तव्याचे! उत्तराखंड सरकारच्या अथॉरिटी विभागाने पतांजली कंपनीच्या १४ उत्पादनांवर बंदी घातली आहे.रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीच्या अवास्तविक जाहिराती प्रकरणात ही बंदी घातल्याचे उत्तराखंड सरकारच्या अथॉरिटी विभागाने सुप्रीम कोर्टाला अफिडेवीट दाखल करून सांगितले आहे.
 
या उत्पादनावर बंदी -
 
दिव्य फार्मसीच्या श्वासारि गोल्ड, श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्तावटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पावर, लिवामृत अँडव्हान्स, लिवोग्रिट,आईग्रिट गोल्ड और पतांजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे.
 
बाबा रामदेव व सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी सुप्रीम कोर्टात आपल्या केलेल्या दाव्यांबाबत माफी मागितली होती. याबाबत उत्तराखंड सरकारच्या अथॉरिटीने ड्रग्स व मॅजिक रेमिडी ॲक्ट व कॉसमेटिक ॲक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अथॉरिटीने केलेल्या चौकशीमध्ये कंपनी आपल्या उत्पादनांबाबत आवश्यक ती माहिती न पुरवू शकल्याने ही कारवाई केली आहे.
 
याआधी १६ एप्रिलला पतांजलीने सर्वोच्च न्यायालयात आपला माफीनामा दिला होता. २३ एप्रिलला न्यायालयाने आपला माफीनामा वर्तमानपत्रात दाखल करण्याचे आदेश दिले होते परंतु पतांजलीकडुन छोट्या आकाराच्या जाहिराती दिल्याने न्यायालयाने पुन्हा फटकारले व नवीन मोठ्या जाहिराती देण्याचे आदेश दिले होते. पतांजली आयुर्वेदिक व त्यांची उपकंपनी दिव्य फार्मसीचा उत्पादनावरील बंदीसोबत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवानाही रद्द करण्यात आला आहे.
 
SLA ने उत्तराखंडमधील सर्व आयुर्वेदिक/युनानी औषध कारखान्यांना खालील सूचना जारी केल्या आहेत.
 
 - प्रत्येक आयुर्वेदिक/युनानी औषध कारखाना औषध आणि जादू उपचार कायदा, 1954 चे काटेकोरपणे पालन करेल.
 
- कोणताही फार्मास्युटिकल कारखाना त्याच्या उत्पादनाच्या लेबलवर आयुष मंत्रालयाने मंजूर/प्रमाणित केलेले दावे वापरणार नाही
 
- जाहिरातींनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९, केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा,१९९५ प्रतीक आणि नावे कायदा, १९५० अंतर्गत तरतुदींचे पालन केले पाहिजे.
 
- प्रत्येक फार्मास्युटिकल फॅक्टरी त्यांच्या उत्पादनांच्या लेबलिंगसाठी ड्रग अँड कॉस्मेटिक कायदा, १९४५ च्या नियम १६१ ,१६१ A आणि १६१ B चे संपूर्ण पालन सुनिश्चित करेल
 
-प्रत्येक आयुर्वेदिक/युनानी औषध कंपनीने ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा,१९९५ प्रतीक आणि नावे कायदा, १९५० आणि औषध आणि जादू उपचार कायदा, १९५४ मधील तरतुदींचा अभ्यास केला पाहिजे आणि जाहिरातींचे प्रसारण आचारसंहितेनंतरच केले जावे.
 
ही कारवाई चुकीच्या अथवा दिशाभूल करणारे जाहिराती म्हणून सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई केली आहे.