अमोल कोल्हेंचं टेन्शन वाढणार! शिरूरमध्ये अपक्षाच्या हाती तुतारी

30 Apr 2024 13:00:48

Amol Kolhe 
 
पुणे : राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु आहे. अशातच शिरुर लोकसभा मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांची चिंता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे राहिले असून निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे शरद पवार गट सर्वत्र तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे उमेदवार आहेत.
 
हे वाचलंत का? -  "मोठे नेते कृषीमंत्री असताना उसाचा एफआरपी फक्त २०० रुपये होता!"
 
अमोल कोल्हे तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवणार आहेत. मात्र, आता शिरुर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रंपेट हे चिन्ह मिळाले आहे. परंतू, निवडणूक आयोगाने याचा तुतारी असाच उल्लेख केला आहे. त्यामुळे एकाच नावाचे दोन चिन्ह झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. तसेच या सगळ्याचा फटका अमोल कोल्हेंना बसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याआधी बारामती लोकसभा मतदारसंघातही असाच प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0