शिवाजी महाराजांचे पुण्यस्मरण

    03-Apr-2024
Total Views |
 
shivaji maharaj
 
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी. शिवाजी महाराजांचा जन्मदिन आपण उत्साहात साजरा करतो. त्यांच्या पुण्यस्मरण दिनाचे मात्र औचित्य गरजेचे राहिलेले नाही. त्यांच्या मृत्यतूनंतर अनेक शतकांनंतरही अगदी रोजच कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण त्यांचे स्मरण करतो. आपण विसरू शकत नाही असे कार्य त्यांनी या संपूर्ण हिंदुस्थानासाठी करून ठेवले आहे.
 
आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा पुनरुज्जीवित केली.
 
आपल्या प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
त्यांच्या मृत्यूसंबंधी मात्र अनेक मत मतांतरे आहेत. घोड्याला टाच मारून सदा सैन्याच्या आघाडीस असलेल्या राजननं मृत्यू मात्र मंचकावर आला.