मंत्री आतिशी यांना 'ते' वक्तव्य भोवणार!, भाजपकडून कायदेशीर नोटीस

    03-Apr-2024
Total Views |
bjp-sends-legal-notice-to-atishi-marlena
 
 
नवी दिल्ली :       दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांना भाजपकडून कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. सध्या दिल्लीसरकारचा मद्य घोटाळा देशभरात गाजत असतानाच दिल्ली प्रदेश अध्यक्षांकडून मंत्री आतिशी यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. आतिशी यांनी भाजपवर आरोप करत 'करिअर वाचवायचे असेल तर भाजपमध्ये जा', या वक्तव्याचे पुरावे मागणारी नोटीस पाठविण्यात आली आहे.




दरम्यान, या नोटीस प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, "आम्ही दिल्लीच्या शिक्षण मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी आपल्यावर भाजप पक्षांतराचा दबाव असल्याचे सांगितले आहे, आता भाजपकडून यासंदर्भात पुरावा मागण्यात येत आहेत. पक्षााकडून कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून त्यांना सोडणार नाही. या नोटीशीला त्यांना उत्तर द्यावे लागेल, असेदेखील प्रदेशाध्यक्ष यावेळी म्हणाले.


हे वाचलंत का? - भारतीय कामगारांची पहिली तुकडी इस्त्रायलला रवाना?, इस्त्रायली राजदूतांची पोस्ट चर्चेत!


दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आतिशी मार्लेनाचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्या म्हणाल्या की, भाजपने त्यांना ऑफर दिली असून जर तुम्हाला स्वतःची कारकीर्द वाचवायची असेल तर भाजपमध्ये यावे. आता याप्रकरणी भाजपने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून यासंबंधित पुरावे मागवले आहेत.



भाजप दिल्ली प्रदेश अध्यक्ष यांनी आपल्या 'X' अकाऊंटद्वारे पोस्ट करत लिहिले की, “काल आपचे नेत्या आतिशी म्हणाल्या की, त्यांच्या जवळच्या व्यक्तीद्वारे पक्षांतरासाठी दबाव आणला जात आहे. यापूर्वीही त्यांनी असे बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांनी खोटे व बनावट विधान केले आहे.” आता मंत्री आतिशी यावर काय बोलणार, भाजपच्या कायदेशीर नोटिशीला काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.