‘केजीएफ’ फेम यश ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’मध्ये दिसणार हटके लूकमध्ये...

    03-Apr-2024
Total Views |
toxic  
 
मुंबई : पॅन इंडिया चित्रपटांपैकी एक, रॉकिंग स्टार यशचा 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा यशला (Yash) वेगळ्या लूकमध्ये आणि व्यक्तिरेखेत पाहण्यासाठी देखील त्याचे चाह उत्सुक आहेत. गीतू मोहनदास दिग्दर्शित आणि व्यंकट के नारायण यांच्या KVN प्रॉडक्शन्स आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स द्वारे निर्मित, ‘टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. लवकरच या चित्रपटाचे चित्रिकरण कर्नाटकात सुरू होणार आहे.
 
चित्रपटाचे निर्माते म्हणतात, "काही सुविधांअभावी आमचे मोठे चित्रपट राज्याबाहेर चित्रित केले जातात. रॉकिंग स्टार यशने बऱ्याच दिवसांपासून ही चिंता व्यक्त केली आहे आणि ती बदलण्यासाठी आम्ही KVN प्रॉडक्शन आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स कर्नाटकातच टॉक्सिकचे चित्रिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून आम्ही इथेच मोठे सेट्स उभारले आहेत; जेणेकरुन कर्नाटकातीलच तंत्रज्ञ आणि नवोदितांना रोजगार मिळेल".
 
गीतू मोहनदास दिग्दर्शित आणि व्यंकट के नारायण यांच्या KVN प्रॉडक्शन्स आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स द्वारे सह-निर्मित, 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' हा चित्रपट देशभरात १० एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.