पश्चिम बंगालमध्ये चाललंय काय? महिलेच्या शरीराचे तुकडे करुन जंगलात फेकले

    03-Apr-2024
Total Views |
 kolkata
 
कोलकाता : पश्चिम बंगालमधील वाटगंज पोलीस स्टेशन हद्दीतील एका रिकाम्या क्वार्टरमध्ये एका महिलेचा मृतदेह काळ्या प्लास्टिकच्या पिशवीमधून अनेक तुकड्यांमध्ये पडलेला आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, जप्त केलेल्या तुकड्यांमधून शरीराचे अनेक अवयव अद्याप गायब आहेत. मृतदेहाची ओळख अद्याप पटललेली नाही. या महिलेची हत्या कोणी केली याचा तपास पोलिस करत आहेत.
 
मंगळवारी, दि. २ एप्रिल २०२४ जेव्हा एका इमारतीतील काही लोकांनी रिकाम्या क्वार्टरजवळ काहीतरी सडत असल्याची तक्रार केली तेव्हा ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी येऊन पाहिलं तेव्हा त्यांना पन्नीमध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे आढळले, ज्यामध्ये डोके, धड, हात, पाय यासह शरीराचे वेगवेगळे भाग पडलेले होते.
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नष्ट झालेले तुकडे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तीन ते चार दिवसांपूर्वी महिलेची हत्या करून मृतदेह दुसऱ्या ठिकाणाहून आणून रिकाम्या क्वार्टरमध्ये फेकून दिल्याचा अंदाज आहे. खून होऊन बराच काळ लोटला असल्याने मृतदेहाचे सर्व तुकडे कुजण्यास सुरुवात झाली होती व मृतदेहातून दुर्गंधी येत होती.
 
या घटनेचा तपास करत असलेले जॉइंट सीपी सय्यद वकार रझा म्हणाले, “आम्हाला तीन प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे सापडले आहेत. तिच्या कपाळावर सिंदूर आणि बिंदी होती जी ती विवाहित असल्याचे दर्शविते. पिशवीच्या आत विटा देखील आहेत, ज्यावरून पिशवी नदी किंवा तलावात फेकण्याचा प्रयत्न झाला असावा असे दिसते. प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा हात, तळ आणि पोटाचा भाग आढळून आला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
 
ही प्लास्टिक पिशवी कोणीतरी घाईघाईत फेकून दिल्याचे दिसते, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक रिकाम्या क्वार्टरजवळ बोलण्यासाठी आले होते. त्यांनी दुपारी २.५० वाजता पोलिसांना या पिशव्यांची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तेथे तीन काळ्या पॉलिथिनच्या पिशव्या पडल्या होत्या आणि त्यामध्ये ३०-३५ वर्षीय महिलेच्या शरीराचे अवयव होते. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. ट्रॅकर कुत्रे तैनात करण्यात आले आहेत. तपासानंतर अधिक माहिती समोर येईल.