व्होडाफोन आयडिया २०००० कोटींचा निधी उभारणार

संचालक मंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

    03-Apr-2024
Total Views |

VI
 
मुंबई: वोडाफोन आयडिया समभागात (Shares) चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडियाच्या निधी वाढवण्याचा प्रस्तावाला समभागधारकांनी मान्यता दिली आहे. याचा परिणाम आज बीएसीत जाणवून समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाली आहे. आज कंपनीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. २०००० कोटींपर्यंत किंमतीत वाढ करण्याच्या निर्णयानंतर हे समभाग वधारले आहेत. या निधीपैकी काही भाग इक्विटी व इक्विटी लिंक इन्स्ट्रुमेंटसच्या माध्यमातून हा निधी वाढवण्यात येणार आहे.
 
कंपनीला आपले नेटवर्क विस्तारीत करण्यासाठी निधीची आवश्यकता होती. ४ जी बरोबरच ५ जी नेटवर्क क्षमतेत वाढ करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. सध्या कंपनीकडे २०० दशलक्षहून अधिक सबस्क्राईबर आहेत. या नेटवर्क मध्ये वाढ झाल्याने कनेक्टिव्हिटी दर्जात सुधारणा होऊ शकते. फेब्रुवारी २८ ला हा प्रस्ताव पारित करण्यात येणार होता आज कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजूरी देत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
 
याशिवाय उर्वरित निधीतून कंपनी आपली थकित देणी कर्जदारांना देणार आहे.२०००० कोटींची रक्कम जमा केल्यावर ही थकीत देणी कंपनीकडून देण्यात येणार आहेत. कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार निधी जमल्यावर कंपनीच्या प्रमोटरचे (संस्थापक) भागभांडवल ५० टक्क्यांवरून खाली येत ४० टक्क्यांवर खाली येणार आहे. सध्या आदित्य बिर्ला समुह व व्होडाफोन या दोघांचे मिळून कंपनीत ४८.९१ टक्के भागभांडवल आहे.