उन्मेश पाटील उबाठा गटात प्रवेश करणार!

    03-Apr-2024
Total Views |
 
Unmesh Patil 
 
मुंबई : भाजपचे नेते आणि विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे उबाठा गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी दुपारी मातोश्रीवर हा प्रक्षप्रवेश होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, त्यांना जळगाव लोकसभेतून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
 
संपूर्ण राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची तयारी सुरु असून सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. याशिवाय निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशही सुरु आहेत. अशातच आता भाजपचे उन्मेश पाटील हेदेखील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  "जे आम्हाला जमलं नाही, ते पवारांनी करुन दाखवलं!" असं का म्हणाले फडणवीस?
 
जळगाव लोकसभेसाठी महायूतीकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी मंगळवारी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेटही घेतली होती. त्यानंतर आता ते उबाठा गटात प्रवेश करणार आहेत. तसेच उन्मेश पाटील यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.