पाकिस्तानी हिंदू स्थलांतरितांना 'सीमाजन कल्याण समिती'चा मदतीचा हात

    03-Apr-2024
Total Views |

Simajan Kalyan Samiti

जयपूर :
पाकिस्तानात दुर्व्यवहार झालेल्या हिंदू स्थलांतरितांना आश्रय आणि कायदेशीर मान्यता देण्यासाठी 'सीमाजन कल्याण समिती' (Simajan Kalyan Samiti) गेल्या एका आठवड्यापासून राजस्थानच्या सीमा भागात शिबिरे घेत आहे. या अंतर्गत आतापर्यंत पाकिस्तानहून आलेल्या ३०० हून अधिक हिंदू स्थलांतरितांना नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत (सीएए) नागरिकत्व मिळविण्यासाठी मदत करत आहे. तसेच येणारी आव्हाने आणि विवादांवर प्रकाश टाकत आहे. या शिबिरांद्वारे त्यांना 'पात्रता प्रमाणपत्र' समितीच्या माध्यमातून दिली जात आहेत.

सीमाजन कल्याण समिती सध्या प्रामुख्याने पाकिस्तान सीमेवरील प्रदेशांमध्ये कार्यरत आहे. राजस्थानमधील बारमेर, जैसलमेर आणि जोधपूर येथील ३०० हून अधिक स्थलांतरीतांना मदत केली आहे. तसेच भारताच्या गृह मंत्रालयाने सुरू केलेल्या indiancitizenshiponline.nic.in या अधिकृत नागरिकत्व पोर्टलवर स्थलांतरीत व्यक्तींची कागदपत्रे अपलोड करण्या त्यांनी मदतही केली आहे.

हे वाचलंत का? : दिवंगत पतीच्या स्मरणार्थ पत्नीकडून कोट्यवधींची संपत्ती गरजूंसाठी समर्पित

समितीचे सदस्य आणि वकील विक्रम सिंह राजपुरोहित यांनी यावेळी स्पष्ट केले की, समितीच्या नोंदणीकृत स्थितीमुळे ती ही प्रमाणपत्रे जारी करू शकते. या प्रमाणपत्रांना मान्यता देण्यात पदाधिकारी त्रिभुवनसिंह राठोड यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. काही लोक याला नोकरशाही म्हणतील, परंतु ज्यांनी आपल्या ओळखीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केली त्यांच्यासाठी ही जीवनरेखा आहे.

भारतात २०१० पूर्वी आलेल्या असंख्य व्यक्तींची दुर्दशा मांडताना राजपुरोहित म्हणाले की, ते अजूनही त्यांच्या नागरिकत्वाच्या स्थितीबाबत संभ्रमात आहेत. ही एक व्यापक समस्या आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार एकट्या जोधपूरमध्ये साधारण ५ हजार ते ६ हजार लोक नागरिकत्वाशी संबंधित आव्हानांना तोंड देत आहेत. राजस्थानमध्ये पाकिस्तानी हिंदू निर्वासितांच्या अंदाजे ४०० वस्त्या आहेत, ज्यात सुमारे दोन लाख लोकांचा समावेश आहे. सीएए हा या स्थलांतरितांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. १९७१ च्या युद्धादरम्यान आणि नंतर बांगलादेशातून स्थलांतरित झालेल्या पश्चिम बंगालमधील मतुआसारख्या गटांसाठी काही आव्हाने कायम आहेत, कारण सीएए पोर्टल अतिरिक्त कागदपत्रांची मागणी करत आहे."