ब्लॅकस्टोन कंपनी दरवर्षी २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार !

ब्लॅकस्टोनने भारतात ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक यापूर्वी केली

    03-Apr-2024
Total Views |

Blackstone
 
 
मुंबई: ब्लॅकस्टोन कंपनी भारतात २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने आश्ववस्त होत सांगितले आहे. यापूर्वी ब्लॅकस्टोन या खाजगी इक्विटी कंपनीने भारतात ५० अब्ज डॉलरची गुंतवणूक यापूर्वीच केली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी ग्रे यांनी कंपनीच्या भावी हालचालीसंबंधी माहिती दिली आहे.
 
भारतासारख्या देशात कंपनीने भारतातील व्यवसायात फेरबदल करायचे ठरवले आहे. कंपन्यांचे भारतातील इज ऑफ डुईंग बिझनेस, व चटकन विलीनीकरण अधिग्रहण व्हावे यासाठी कंपनी पुढाकार घेणार आहे. न्यूयॉर्क स्थित कंपनी ब्लॅकस्टोन गेल्या दोन दशकांपासून भारतात कार्यरत आहे. जगातील अनेक महत्वाच्या उद्योगात यशस्वीपणे कंपनीने गुंतवणूक केली होती.
 
प्रसारमाध्यमांना कंपनीचे वरिष्ठ संचालक अमित दिक्षीत यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. याविषयी बोलताना ' कंपनी दरवर्षी भारतात २ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे ' असे विधान बोलताना केले. कंपनीची भारतात ७५ लोकांची टीम कार्यकारी कामकाजात निर्णय घेते. दिक्षीत यांनी सांगितल्याप्रमाणे, पुढील ५ वर्षात कंपनी २५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. ज्यामध्ये १७ अब्ज डॉलर नव्या उद्योगात व ७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक वेल्थ जनरेशनसाठी करणार आहे.'
 
ग्रे यांनी निवेदनाद्वारे म्हणण्यानुसार भारतात गुंतवणूकदारांसाठी झालेले सकारात्मक बदल ज्यामध्ये इन्सोलवंसी व बँककरपसी कोड व जीएसटी यांसारख्या भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करत भारतात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले आहे.
 
भविष्यासाठी ब्लॅकस्टोनच्या आवडीनिवडींमध्ये पायाभूत सुविधा क्षेत्राचा समावेश असेल, जेथे ते युरोप आणि यूएसमध्ये होते तितके भारतात सक्रिय नव्हते, ग्रे म्हणाले की, ते त्याच्या अनेक फंडांप्रमाणे क्रेडिट फंड भारतात सुरू करण्याची देखील शक्यता आहे.
 
त्याशिवाय, रिअल इस्टेट, लॉजिस्टिक्स, डेटा सेंटर्स, हॉस्पिटॅलिटी, मूल्यवर्धित निर्यातदार, ऊर्जा संक्रमण आणि देशातील वाढत्या मध्यमवर्गावर खेळत असलेल्या थीममध्ये कंपनी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे, ज्यामध्ये आरोग्यसेवा, वित्तीय सेवा आणि प्रवास ही क्षेत्रे असतील असे ग्रे म्हणाले आहेत.