आजपासून भारती हेक्साकॉमचा आयपीओ खरेदीसाठी बाजारात

प्राईज बँड ५४२- ५७० रुपये प्रति समभाग निश्चित

    03-Apr-2024
Total Views |

Bharati Hexacom
 
Bharti Hexacom IPO Update -
 
मुंबई: आजपासून गुंतवणूकदारांसाठी भारती हेक्साकॉम कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होत आहे. भारती एअरटेल या कंपनीची उपकंपनी असलेली भारती हेक्साकॉम टेलिकॉम सुविधा ग्राहकांना पुरवते.आयपीओपूर्वी १९२४.७ कोटी रुपये कंपनीने अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांकडून उभे केले आहेत.
 
सकाळी ११ पासून ०.३ वेळा हा आयपीओ सबस्क्राईब झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटल्यानुसार, कंपनीने ३३७५०००० रुपयांचे समभागानचे (Shares) अँकर गुंतवणूकदारांना वाटप याआधी वाट केले आहे. या आयपीओसाठी एसबीआय कॅपिटल मार्केट, एक्सिस कॅपिटल, बीओबी कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज या कंपन्या बुक लीड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.
 
एकूण समभागांपैकी ४१.१२ टक्क्याचे समभाग खाजगी गुंतवणूकदारांना दिले असून उर्वरित समभागांची किरकोळ गुंतवणूकदारांना विक्री होणार आहे. यांमध्ये ऑफर फॉर सेल (OFS) म्हणून टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया या कंपनीच्या अस्तिवात असलेल्या भारती हेक्साकॉममधील समभागांपैकी १५ टक्के वाटा विक्रीसाठी असणार आहे. स्वतः भारती एअरटेल कंपनीचे या भारती हेक्साकॉम मध्ये ७० टक्के समभाग आहेत व उर्वरित ३० टक्के टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडियाकडे आहेत.
 
एसबीआय कॅपिटल,एक्सिस कॅपिटल,बीओबी कॅपिटल मार्केट,आयसीआयसीआय सिक्युरिटी,आयआयएफएल सिक्युरिटीज यांची मर्चंट बँकर म्हणून या आयपीओसाठी निवड झाली आहे.
 
एकूण भागभांडवलापैकी ७५ टक्के वाटा हा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Buyers) साठी व १५ टक्के विना संस्थापक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors) साठी १५ टक्के भागभांडवल व १० टक्के भागभांडवल किरकोळ गुंतवणूकदारांसाठी(Retail Investors) भागभांडवल उपलब्ध असणार आहे.
 
कंपनीचा प्राईज बँड ५४२- ५७० रुपये प्रति समभाग इतका ठरवला गेला आहे.एकूण खरेदी करण्यासाठी २६ समभागांचा कमीत कमी एक साठा (Lot) खरेदी करावा लागणार आहे. जास्तीत जास्ती १३ समभागांचे साठे किरकोळ गुंतवणूकदारांना खरेदी करता येणार आहेत.
 
भारती हेक्साकॉमने जानेवारी २०२४ मध्ये आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट भरला होता. भारती हेक्साकॉम कंपनी विशेषतः राजस्थान व ईशान्य भारतात टेलिकॉम सुविधा पुरवते.कंपनीचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये ५४९ कोटी होता. मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक नफ्यात ६७.२ टक्क्याने घट झाली आहे.उलाढालीतून एकूण महसूलात आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २१.७ टक्क्याने वाढ होत ६५७९ कोटींनी महसुलात वाढ झाली होती.