“मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे”, लोकसभा निवडणूकीत आयुष्यमान खुरानावर मोठी जबाबदारी

    03-Apr-2024
Total Views |
केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाची युथ आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे.
 

khurana  
 
मुंबई : अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. बऱ्याचदा सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांचा तो भाग असतो. आता युष्यमान खुराना थेट नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुष्यमानवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाची युथ आयकॉन म्हणून निवड केली असून तो मतदारांना व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहे.
 
हे वाचलंत का? - ‘अ टेलर मर्डर स्टोरी’; राजस्थानमधील कन्हैयालाल यांच्या मृत्यूचे सत्य मांडणारा थरारपट  
 
post  
 
 केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाचा व्हिडीओ प्रदर्शित केला असून त्यात तो मतदारांना आपण मतदान का केले पाहिजे? हे सांगताना दिसत आहे. आयुष्यमान म्हणतो, “मतदान न करण्यासाठी १०१ कारणे आहेत, पण मतदान करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे आणि ते म्हणजे आपली जबाबदारी, देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी”. पुढे तो म्हणतो, “प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावत राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे. जागरुक नागरिकाचे हे कर्तव्य आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असून लोकशाही देशात मतदानाचे अधिकार बजावणे हे सशक्तिकरणाचे प्रतिक आहे”, असेही तो म्हणाला.