‘अ टेलर मर्डर स्टोरी’; राजस्थानमधील कन्हैयालाल यांच्या मृत्यूचे सत्य मांडणारा थरारपट

    03-Apr-2024
Total Views |
राजस्थानमधील सामान्य टेलरची हत्या उलगडणारा चित्रपट लवकरच येणार भेटीला.
 murder story  
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या वास्तववादी चित्रपटांना प्रेक्षकही प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. अशीच एक मनाला चटका लावणारी वास्तववादी सत्य घटना लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. राजस्थानमधील एक सामान्य टेलर कन्हैयालाल यांची क्रुरपणे केलेली हत्या दिग्दर्शक अमीत जानी चित्रपस्वरुपात घेऊन येणार आहेत. नुकताच ‘अ टेलर मर्डर स्टोरी’ (A Tailor Murder Story) या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
 
 
काय आहे घटना?
 
राजस्थानमधील एक सामान्य टेलर कन्हैयालाल यांची २८ जून २०२२ रोजी क्रुरपण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या फोनवरुन लोकांच्या धार्मिक भावना दु:खावणारी एक पोस्ट सोशल मिडियावर टाकली गेली असा आरोप करण्यात आला होता. त्यासाठी त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र,कन्हैयालाल यांनी अशी कोणतीही पोस्ट केली नसल्याचे समोर आले होते. परंतू, त्यांची दोन जणांनी अत्यंत निर्दयीपणे हत्या केली होती.
 
 
 
दरम्यान, या चित्रपटात कन्हैयालाल यांची व्यक्तीरेखा अभिनेते विजय राज साकारणार आहेत. लवकरच या चित्रपटातील अन्य कलाकारांबद्दल देखी माहिती समोर येईल आणि हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल दे देखील जाहिर केले जाईल.