नेदरलँडमधील २८ वर्षीय तरुणी मे महिन्यात संपवणार आयुष्य, काय आहे कारण?

03 Apr 2024 12:54:09

Dutch
 
मुंबई, दि. ३ एप्रिल, (प्रतिनिधी): युरोप खंडाच्या उत्तर पश्चिमेला असलेल्या नेदरलँडमधील (Netherlands) एका गावात राहणाऱ्या झोराया टेर बीक या २८ वर्षीय तरुणीने कायदेशीररित्या आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. (Euthanasia) अहवालानुसार, शारीरिकदृष्ट्या निरोगी असूनही, तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षामुळे तिने इच्छामरणाचा पर्याय निवडला आहे.
 
तिला यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला इच्छामरणाची अपेक्षा आहे. नेदरलँड्सने २००१ साली इच्छामरण कायदेशीर केले. तसे करणारा नेदरलँड्स हा जगातील पहिला देश आहे. तेव्हापासून, इच्छामरण हवे असलेल्या लोकांची वाढती संख्या धक्कादायक आहे.
सामान्यतः, आपण जेव्हा इच्छामरण इच्छीणाऱ्या लोकांचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गंभीर दुर्धर आजाराने ग्रस्त किंवा वयोवृद्ध माणसे समोर येतात. परंतु, सध्या शारीरिकरित्या आणि सक्षम तरुण- तरुणी या कडे पाहू लागले आहेत. टेर बीकने माध्यमांना सांगितले की तीच्या मृत्यूपश्च्यात तिचे शरीर दहन करण्यात येणार आहे.
 
“मला माझ्या जोडीदारावर माझे कफन नीटनेटकी ठेवण्याच्या जबाबदारीचे ओझे द्यायचे नाही. "आम्ही अजून कलश निवडला नाही आहे, पण ते माझे नवीन घर असेल!" असे ती म्हणाली.
 
तिच्या मानसिक आरोग्याच्या संघर्षांबद्दल बोलताना तिने सांगितले की एकदा मानसोपचारतज्ज्ञाने तिला सांगितले, “आम्ही तुझ्यासाठी आणखी काही करू शकत नाही." त्याच वेळी तिने इच्छामरणाचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला.
 
तिच्या मानसोपचार तिला डिप्रेशन, ऑटिझम आणि बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. उदासीनता किंवा चिंता वाढली आहे, आर्थिक अनिश्चितता आहे, हवामान बदल, सोशल मीडिया, भीती आणि निराशेच्या अमर्याद गर्तेत आजचा तरुणवर्ग जगत असल्याचे चित्र पाश्चिमात्य देशांमध्ये दिसून येत आहे.
 
मानसिक वेदनांच्या बाबतीत बर्याच प्रकरणांमध्ये, उपचार केले जाऊ शकतात. तरीही दुःखात जगण्याऐवजी आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेत असलेल्यांची संख्या पाश्चिमात्य देशात वाढत चालली आहे.
Powered By Sangraha 9.0