भारतीय रेल्वेचे मिशन गती शक्ती वेगवान होणार

२००हुन अधिक गती शक्ती टर्मिनलच्या कामांना मिळणार गती

    29-Apr-2024
Total Views |

malvahtuk


मुंबई, दि.२९ :
मालवाहतुकीच्या कमाईला चालना देण्यासाठी आणि ट्रॅकवरील गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त 200 टर्मिनल स्थापन करण्याच्या योजनांसह भारतीय रेल्वे आपल्या गती शक्ती कार्गो टर्मिनल नेटवर्कचा विस्तार करत आहे. प्रत्येक टर्मिनलची अंदाजे किंमत सुमारे ७० कोटी रुपये आहे. सर्व टर्मिनलसाठी एकूण अंदाजे १४ ,००० कोटी रुपये इतका खर्च येण्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय रेल्वेने गत आर्थिक वर्षात २.५६ लाख कोटींहून अधिक कमाई केली आहे. ज्यात आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मालवाहतूक सेवांचा वाटा ७० टक्के आहे. अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात २०२४-२५पर्यंत १०० मल्टी-मॉडल टर्मिनल विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये ७७ टर्मिनल आधीच सुरू झाले आहेत. पश्चिम बंगाल, झारखंड आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये असलेल्या या टर्मिनल्समध्ये कॉन्कोर आणि रिलायन्ससारख्या ऑपरेटरचा समावेश आहे. २०३०पर्यंत देशाच्या मालवाहतुकीचा वाटा २९ वरून ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. कोळसा, लोहखनिज आणि सिमेंट ही सर्वाधिक वाहतूक होणारी माल आहे. मल्टी-मॉडल टर्मिनल्समुळे मालाची जलद वाहतूक आणि ट्रॅक-कंजेशन कमी होत असल्याने पुढील काही वर्षांसाठी दरवर्षी ५,००० किमी नवीन ट्रॅक जोडणी सुरु ठेवण्याची रेल्वेची योजना आहे.