जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, “आता थेट पोलीस स्टेशनच…”

29 Apr 2024 12:23:40
अभिनेत्री जुई गडकरी हिला एका तरुणीने सोशल मिडियावर मेसेज करत धमकी दिली असून याबद्दल आता जुईने ठोस पावले उचलली आहेत.
 

jui  
 
मुंबई : सोशल मिडियावर एकीकडे कलाकारांना ट्रोल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दुसरीकडे कलाकारांना धमक्या देण्याचेही प्रकार घडताना दिसत आहेत. अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने तिच्या सोबत घडलेला एक प्रसंग सोशल मिडियावर शेअर करत थेट एका युजरला पोलिस स्टेशनमध्ये भेटू असे म्हटले आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. एका युजरने जुई तु आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो बॅक कर नाहीतर तुला पोलिसात टाकेन अशी धमकी दिली आहे. यावर जुईने (Jui Gadkari) देखील त्या युजरचा चांगलाच समाचार घेतला आहे.
 
‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे जुई गडकरीचा चाहतावर्ग वाढला आहे. त्यामुळे जुई कायमच सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. पण जुईला एका तरुणीने सोशल मिडियावर मेसेज करुन धमकीच दिली आहे. यात धमकी देणारी तरुणी लिहिते, “काय गं तुला माज आलाय का, आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? कळत नाही का? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं, सपना पांचाळ, राखी सुतार, करुणा विन्हेरकर, यश विन्हेरकर यांना... तू फॉलो कर नाहीतर तुला जेलमध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती हिरॉइन होतीस. कारण आम्हाला वाटायचं की तू फॉलो करशील आम्हाला, पण नाही... आणि म्हणून मी तुला पोलिसात टाकेन. उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजल. कुठेही पळायचं नाही, ओके बाय.'
 

jui  
 
यावर जुई गडकरीने तिला चांगलेच सुनावले असून लिहिले आहे की, “अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, आधीच सांगते. थेट पोलीस स्टेशनलाच भेटू मग आपण'. ज्या इन्स्टाग्राम पेजवरुन जुईला धमकी आली आहे त्या युजरला टॅग करत तिने असेही म्हटले की, '@rakhee_sutar झालीस तू फेमस, येच कर्जतला, बघतेच मी पण!”. आता यावर काही पलटउत्तर येणार का किंवा याचे पडसाद काय उमटणार ते पाहावे लागेल.
Powered By Sangraha 9.0