उद्यापासून बाजारात तीन आयपीओ येणार, जाणून घ्या या तिन्ही आयपीओची इत्यंभूत माहिती....

३० एप्रिल ते ३ मेपर्यंत आयपीओ गुंतवणूकीसाठी उपलब्ध

    29-Apr-2024
Total Views |

ipo
 
 
मुंबई: तीन कंपन्याचे आयपीओ उद्यापासून गुंतवणूकदारांसाठी हजर होणार आहेत. साई स्वामी मेटल व ऑलोय्स लिमिटेड एमके प्रोडक्ट लिमिटेड, स्टोरेज टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेशन लिमिटेड या तीन कंपन्याचे आयपीओ उद्यापासून दाखल होत गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची नवी संधी उपलब्ध झालेली आहे.
 
१) स्टोरेज टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेशन लिमिटेड - (Storage Technologies and Automation Limited) - या कंपनीचा आयपीओ बीएसई एसएमई विभागात दाखल होणार आहे.या कंपनीचा आयपीओ (IPO) उद्या ३० एप्रिलपासून ते ३ मे पर्यंत गुंतवणूकदारांना सबस्क्राईब करण्यासाठी उपलब्ध असणार आहे.६ मे पर्यंत कंपनीच्या आयपीओचे वाटप निश्चित होऊ शकते.८ मे २०२४ पासून बाजारात हा समभाग नोंदणीकृत होण्याची शक्यता आहे. हा आयपीओ सबस्क्राईब करण्यासाठी कमीत कमी १२४८०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ज्यामध्ये कमीत कमी १६०० समभागांचा (shares) चा गठ्ठा (Lot) उपलब्ध असणार आहे. कंपनीने प्राउज बँड ७३ ते ७८ रुपये प्रति समभाग निश्चित केला आहे.
 
OneView Corporate Advisor Private Limited ही कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Intergrated Registry Management Services Private Limited ही कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहेत.
 
आयपीओत अपात्र ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा (Refund) ७ मे पासून उपलब्ध असू शकतो.एकूण समभागापैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) यांना ५० टक्क्यांपर्यंत समभाग वाटप करण्यात येऊ शकते.किरकोळ गुंतवणूकदारांना
(Retail Investors) ३५ टक्क्यांपर्यंत समभाग उपलब्ध असणार आहे.विना संस्थात्मक गुंतवणूकदारांना (NII) १५ टक्के वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध होऊ शकतो.खासीम सईत, मोहम्मद आरीफ अब्दुल गफार, हानिफ खत्री, सयद अझीम,अफजल हुसेन, नुमन खासीम हे कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहेत.
 
स्टोरेज टेक्नॉलॉजी अँड ऑटोमेशन कंपनी मेटल स्टोरेज रॅक उत्पादनात आहे. ऑटोमेटेड वेअर हाऊस व इतर स्टोरेज सुविधा कंपनी पुरवते.ही बंगळुरूस्थित कंपनीने आतापर्यंत २५०० हून अधिक प्रकल्पावर काम केले आहे. कंपनीच्या महसूलात ३१ मार्चपर्यंत १६.४२ टक्क्यांनी वाढ होत ४००४.०१ कोटींचा महसूल मिळवला होता.कंपनींच्या करोत्तर नफ्यात (Profit After Tax) मध्ये ३३५.७२ टक्क्यांनी वाढ होत नफा ४८.३० कोटींवर झाला होता.कंपनींच्या माहितीनुसार,आयपीओतून उभारलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
 
२) एमके प्रोडक्टस लिमिटेड - (Emkay Products Limited) - या कंपनीचा आयपीओ उद्या ३० एप्रिलपासून ते ३ मे पर्यंत गुंतवणूकदारांना सबस्क्राईब करण्यासाठी उपलब्ध असेल.६ मे पर्यंत कंपनीच्या समभागाचे वाटप निश्चित करण्यात येणार आहे. ही कंपनी बीएसई एसएमई विभागात ८ मे पर्यंत नोंदणीकृत (Register) होणार आहे.कंपनीने या आयपीओसाठी ५२ ते ५५ रूपये प्रति समभाग प्राईज बँड निश्चित केला आहे. या आयपीओत गुंतवणूकीसाठी कमीत कमी ११०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. समभागांचा कमीत कमी गठ्ठा (Lot) २००० समभागांचा असणार आहे.Hem Securities Limited कंपनी या आयपीओसाठी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Pvt Ltd कंपनी या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे.
 
कंपनीकडून समभागाचे वाटप ६ मे पर्यंत गुंतवणूकदारांना करण्यात येणार आहे. अपात्र गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ७ मे पर्यंत मिळणार आहे. ८ मे पर्यंत कंपनी बाजारात नोंदणीकृत (Register) होणार आहे.एकूण समभाग वाटपातील ५० टक्क्यां पर्यंत वाटप पवित्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (Qualified Institutional Investors ) यांना करता येणार आहे तर ३५ टक्के समभाग वाटप किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) साठी करण्यात येणार आहे.१५ टक्के समभाग वाटप विना संस्थात्मक गुंतवणूकदारांना (NII) करण्यात येणार आहे. कंपनी अँकर गुंतवणूकदारांकडून (खाजगी गुंतवणूकदार) ३.५८ कोटी रुपये निधी जमावणार आहे.
 
एमके कंपनी हेल्थकेअर उत्पादनात असुन विविध प्रकारची होती हेल्थकेअर उत्पादनै बनवते. या उत्पादनांचा मुख्य वापर हेल्थकेअर सेंटर, इस्पितळ, नर्सिंग होम अशा ठिकाणी करण्यात येतो.कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ४७.६१ कोटी रुपये आहे.३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनींच्या करोत्तर नफा २१५.३५ कोटी होता.मार्च ३१,२०२३ पर्यंत कंपनीच्या करोत्तर नफ्यात डिसेंबर २०२२ तुलनेत २.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.कंपनीने म्हटल्याप्रमाणे या आयपीओतील जमा केलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी,नवीन मशिनरी विकत घेण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.
 
३) साई स्वामी मेटल व अँड ऑलोय्स लिमिटेड - (Sai Swamy Metals and Alloys IPO) - या कंपनीचा आयपीओ उद्या ३० एप्रिलपासून ते ३ मे पर्यंत गुंतवणूकदारांना सबस्क्राईब करण्यासाठी उपलब्ध असणार आहे.कंपनीने प्रति समभाग प्राईज बँड ६० रुपये निश्चित केला आहे. बीएसई एसएमई विभागात ८ एप्रिलपासून ही कंपनी नोंदणीकृत होणार आहे.
 
 
कमीत कमी गुंतवणूकदारांना १२०००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. कमीतकमी एक गठ्ठा (Lot) २००० समभागांचा असणार आहे. या आयपीओसाठी Swastika Investmart Limited ही कंपनी बुक लिडींग मॅनेजर म्हणून काम पाहणार आहे तर Bigshare Services Private limited कंपनी या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम पाहणार आहे. पात्र गुंतवणूकदारांना ६ मे पर्यंत समभागाचे वाटप करण्यात येऊ शकते.तर अपात्र गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा ७ मे पासून होणार आहे.
 
या आयपीओत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) साठी ५० टक्के वाटा सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असणार आहे तर बाकीच्या विभागांना ५० टक्के वाटा वितरणासाठी उपलब्ध असणार आहे.२०२२ साली स्थापन झालेली कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेनलेस स्टीलच्या उत्पादनात आहे. ३१ मार्च २०२३ पर्यंत कंपनीला ३.८३ कोटींचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल ३९.७१ कोटी रुपये आहे.कंपनींच्या माहितीनुसार आयपीओतून उभारलेल्या निधीचा वापर वर्किंग कॅपिटल गरजेसाठी,उपकंपनीत (Subsidiary) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी , मशिनरी विकत घेण्यासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाणार आहे.