Q4 Results: अल्ट्राटेक सिमेंट चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर कंपनींच्या निव्वळ नफ्यात ३५ टक्क्यांनी वाढ

संचालक मंडळाने प्रति समभाग ७० रुपये लाभांश सुचवला

    29-Apr-2024
Total Views |
 
Ultratech cement
 
 
मुंबई: अल्ट्राटेक सिमेंट या देशातील आघाडीच्या सिमेंट कंपनीने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या इयर ऑन इयर बेसिसवर निव्वळ नफ्यात ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीला निव्वळ नफा मार्च २०२४ पर्यंत २२५८ कोटी झाला आहे. कंपनीच्या महसूलात ९.४१ टक्क्यांनी वाढ होत महसूल २०४१८.९ कोटींवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला १८६६२.३८ कोटींचा महसूल मिळाला होता.
 
कंपनींच्या ईबीआयटीडीएत (करपूर्व नफ्यात) २३.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचा एकूण ईबीआयटीडीए ४११३.८८ कोटींवर पोहोचला आहे. कंपनींच्या कामकाजातील महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ९ टक्यांने वाढ होत महसूल २०४१९ कोटीवर पोहोचला आहे. कंपनींच्या विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर ११ टक्क्यांनी वाढ होत जानेवारी मार्च महिन्यात विक्री ११ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनींच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षाच्या १६७०.१ कोटींच्या तुलनेत २२५८.५७ टक्यांने वाढ झाली आहे.
 
कंपनींच्या करोत्तर नफ्यात डिसेंबर तिमाहीतील तुलनेत (Profit After Tax) २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.कंपनींच्या संचालक मंडळाने ७० रुपये प्रति समभाग लाभांश (Dividend) भागभांडवलधारकांसाठी सुचवला आहे.