दुचाकी नोंदणीसाठी आता नवी सिरीज

२ मे पासून ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार

    29-Apr-2024
Total Views |

RTO


मुंबई, दि.२९ : 
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नविन मालिका सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व)कडून देण्यात आली आहे. २ मे पासून ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे दुचाकी वाहनांसाठी असलेली MH03EM ही मालिका संपत असल्याने दुचाकी वाहनांसाठी MH03EN ही नविन मालिका ०२-०५-२०२४ च्या दरम्यान सुरु करण्यात येणार आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी या मालिकेतून आकर्षक वा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असेल त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज, पत्याच्या पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅनकार्ड व पसंतीच्या क्रमांकासाठी च्या REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI EAST किंवा RTO MUMBAI (EAST) यांच्या नावे काढलेल्या विहीत फीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह या कार्यालयात दि. ०२ मे २०२४ रोजी दुपारी २.००वाजेपर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास महाराष्ट्र शासनाच्या दि ०८ मे २०१६ च्या अधिसुचनेनुसार नियमीत फी व्यतिरिक्त सर्वात जास्त रकमेच्या धनाकर्ष सादर करणा-यास सदर नोंदणी क्रमांक देण्यात येईल. आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्यासाठीची कार्यपध्दती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावलेली असून अनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहन धारकांनी स्वतः कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.