श्रद्धा वाळकर प्रकरणाची पुनरावृत्ती! निझामाने केले पूनमचे तुकडे

29 Apr 2024 11:49:11

Love Jihad 
 
मुंबई : मुंबईत श्रद्धा वाळकर प्रकरणाची पुनरावृत्ती असलेली घटना घडली आहे. मानखुर्द परिसरात एका सुटकेसमध्ये हिंदू तरुणीची डेडबॉडी सापडली असून एका टॅक्सी ड्रायव्हरने तिची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
 
मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक हिंदू तरुणीची सुटकेसमध्ये डेडबॉडी सापडली. १८ एप्रिल रोजी निजाम नामक टॅक्सी ड्रायव्हर तिला पळवून घेऊन गेला. तो तिला कल्याणमध्ये घेऊन गेला आणि तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी सोडला.
 
दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली असून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच दोषीला कठोर शिक्षा होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासनही दिले.
 
माध्यमांशी संवाद साधताना लोढा म्हणाले की, "मुंबईतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांग्लादेशिंचा बंदोबस्त करावा लागेल. अन्यथा हिंदू तरुणी, महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाही. पूनम क्षीरसागर हिला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री, राज्य सरकारचा एक घटक म्हणून प्रयत्न करणार आहेत," असे ते म्हणाले. तसेच २४ तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलनाचा इशाराही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला.
 
 
Powered By Sangraha 9.0