भारतातील ई कॉमर्स बाजारात उसळी ! २०३० पर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था ' इतक्या ' अब्ज रुपयांवर पोहोचणार

29 Apr 2024 12:32:48
 
e commerce
 
 
मुंबई: भारतातील ई कॉमर्स क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते इ कॉमर्स क्षेत्रात ३२५ अब्ज डॉलर्सने वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत मत व्यक्त करताना तज्ञांनी हे क्षेत्र ८०० अब्ज डॉलर्सने वाढू शकते असे म्हटले आहे. इंटरनेट वापरण्यात भारत हा जागतिक पातळीवरील क्रमांक दोनचा देश लागतो.भारतातील ८८१ दशलक्ष युजर्समुळे भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
याशिवाय इन्व्हेस्ट इंडियाने म्हटल्याप्रमाणे ऑनलाईन रिटेल इंडस्ट्रीत भारताचा जगात तिसरा क्रमांक २०३० पर्यंत होऊ शकतो. दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंटरनेटचे वापरकर्ते आणि रिटेल क्षेत्रात होणारी मोठी वाढ, वाढणारी डिजिटल अर्थव्यवस्था यामुळे २०३० पर्यंत भारत ई कॉमर्स क्षेत्रातील जागतिक केंद्र बनू शकते असा कयास तज्ञांनी केला आहे. विशेषतः ऑनलाईन शॉपिंगमध्ये होणारी वाढ, इंटरनेट कनेक्शन मध्ये होणाऱ्या वाढीमुळे ही वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
 
सध्या भारत ई कॉमर्स क्षेत्रातील ७० अब्ज डॉलरची बाजारपेठ असल्याचे समजले जाते.जगभरातील एकूण रिटेल बाजारपेठेत ७ टक्के हिस्सा भारतीय बाजाराचा आहे.२०२२ मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येत ५२ टक्क्यांनी इंटरनेट कनेक्शनमध्ये झाल्याने ही बाजारपेठेत वाढ झाली आहे.२०२५ पर्यंत भारताच्या एकूण लोकसंख्येतील ८७ टक्के लोकसंख्येकडे इंटरनेट कनेक्शन असू शकेल असे भाकीत केले जाते.तज्ञांच्या मते २०१९ मधील तुलनेत मोबाईलवरून इंटरनेट वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
आँनलाईन खरेदीमध्ये सीएजीआर (Compound Annual Growth Rate) याप्रमाणे २२ टक्क्यांनी वाढ होत ग्रामीण भागात ८८ दशलक्ष व शहरी भागात १५ टक्क्यांनी वाढ होत २६३ दशलक्ष वापरकर्त्यांमध्ये वाढ होऊ शकते.याशिवाय टेलिकॉम डेटा टेरिफ वाजवी किंमतीत मिळत असल्यामुळे इंटरनेट कनेक्शनमध्ये वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
 
अहवालात म्हटल्याप्रमाणे २०२६ पर्यंत स्मार्टफोन वापरण्यात १.१८ अब्जाने वाढ होऊ शकते.या वाढीमुळे इंटरनेट वापरकर्त्यांचा वापरात वाढ होऊ शकते.एकूणच वापरात वाढ झाल्याने डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते असा अंदाज या अहवालात व्यक्त केला गेला आहे.
 
मोबाईल डेटा ट्रॅफिकमध्ये २०१८ ते २०२३ मध्ये मोठी वाढ झाली होती. याव्यतिरिक्त युपीआय (Unified Payment Interface) वापरात मोठी वाढ झाल्याने २०२२ पर्यंत युपीआय व्यवहारात मोठी वाढ झाली होती.परिणामी २०२२ पर्यंत व्यवहाराची संख्या १.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत भारताची ८१ टक्के लोकसंख्या स्मार्टफोनचा वापर करू शकते. डिजिटल मूलभूत सुविधेत वाढ झाल्याने ग्राहक सेवेत वाढ झाली आहे.
 
हायपरलोकल मोबिलिटीमध्ये, भारताची द्रुत वाणिज्य बाजारपेठ आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत $५.५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. स्विगी आणि झोमॅटो सारख्या कंपन्या कार-पूलिंग आणि ई-स्कूटर भाड्याने देणे यासारखे नवीन सूक्ष्म सेगमेंट सादर करत बाजारपेठेत आघाडीवर आहेत.आरोग्य तंत्रज्ञानामध्ये,प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा २०२५ पर्यंत दुप्पट वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे लक्षणीय रोजगाराच्या संधी निर्माण होतात.याशिवाय सोशल ई कॉमर्स मधील बाजारात ७० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0