'सैराट'ची ८ वर्ष पूर्ण! रिंकूने शेअर केले आर्ची - परश्याचे खास फोटो

    29-Apr-2024
Total Views |
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाला बघता बघता ८ वर्ष पुर्ण झाली. यानिमित्ताने रिंकूने शेअर केली खास पोस्ट
 

sairat 
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास बदलणारा चित्रपट म्हणजे ‘सैराट’ (Sairat). बॉक्स ऑफिसवर १०० कोटी गाठणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘सैराट’ (Sairat). नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाला आज २९ एप्रिल रोजी प्रदर्शित होऊन ८ वर्ष पुर्ण झाली. २९ एप्रिल २०१६ रोजी ‘सैराट’ आला आणि सोबत दोन नवे हरहुन्नरी कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले. एका रात्रीत नशीब बदलतं का? या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर. सैराटला ८ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने रिंकूने काही विशेष फोटो चाहत्यांच्यासाठी शेअर केले आहेत.
 
‘सैराट’ चित्रपट बऱ्याच कारणांसाठी लक्षात राहिला. नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन, आर्ची आणि परश्या आणि मुळात म्हणजे अजय-अतुल यांचं संगीत. तर 'सैराट'ला आज ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रिंकू राजगुरुने पोस्ट करत लिहिले आहे की, "8 years of Sairat .. सैराटला आज ८ वर्ष पुर्ण झाली…" अशी पोस्ट लिहून रिंकूने रिंकूने तीन फोटो शेअर केले आहेत.
 

sairat 
 
रिंकू सध्या आगामी 'खिल्लार' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. तर अभिनेता आकाश ठोसर दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासोबत ‘बाल शिवाजी’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, पुन्हा एकदा आर्ची आणि परश्या एकत्र दिसावे ही त्यांच्या चाहत्यांची इच्छा पुर्ण होणार का हे येणारा काळच ठरवेल.