विश्वजित कदमांची पलटी! उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात झाले सहभागी

28 Apr 2024 11:43:39

Vishwajit Kadam & Chandrahar Patil 
 
सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उबाठा गटात गेले अनेक दिवस वाद सुरु होता. काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला होता. मात्र, आता विश्वजित कदम उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
महाविकास आघाडीचे जागावाटप होण्याच्या आधीपासूनच काँग्रेस आणि उबाठा या दोन्ही पक्षांकडून या जागेवर दावा सांगण्यात येत होता. जागवाटपात ही जागा उबाठा गटाकडे गेली आणि पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली. परंतू, त्यानंतरही या जागेचा वाद कायम होता.
 
काँग्रेस नेते विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोघांनी सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगलीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, आता विश्वजित कदम हे चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0