अमिताभ बच्चन-प्रभासच्या आगामी 'कल्की' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

28 Apr 2024 13:26:52

kalki  
 
 
मुंबई : बहुप्रतिक्षित आणि चर्चित 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहिर करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन आणि प्रभास यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून लोकं वाट पाहात आहेत. परंतु, आता प्रतिक्षा संपली असून कल्की चित्रपट येत्या (Kalki 2898 AD) जुन महिन्यात प्रदर्शित होणार हे अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे.
 
साय-फाय चित्रपट 'कल्की २८९८ एडी' हा चित्रपट २७ जुन रोजी प्रदर्शित होणार आहे.त्यामुळे आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या अश्वत्थामाचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता.
 

kalki  
 
'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पडूकोण यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. अमिताभ आणि दीपिका यांनी याआधी पिकू चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, प्रभास या दोन्ही कलाकारांसोबत पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे.
Powered By Sangraha 9.0