मोबाईलचा रिचार्ज मारला अन् पाठवले अश्लील मेसेज; अथरुद्दीनला संतप्त जमावाने दिला चोप!

    27-Apr-2024
Total Views |
love jihad case Uttarakhand

देहराडून : उत्तराखंडमधील हल्दवानी येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका दुकानदाराला रस्त्याच्या मधोमध मारहाण करताना दिसतात. ज्यामुळे रस्त्यावर आजूबाजूला गर्दी झालेली पाहायला मिळते. दरम्यान मारहाण झालेल्या तरुणावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आक्रमक जमाव आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात नेण्याबाबत बोलताना दिसत आहे. ही घटना दि. २५ एप्रिल २०२४ रोजी घडली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

हे संपूर्ण प्रकरण हल्द्वानीच्या कोतवाली भागातील आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने दि. २५ एप्रिल रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत पीडितेच्या आईने सांगितले की, तिची १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी मोबाईलच्या रिचार्ज करण्यासाठी दुकानात गेली होती. अथरुद्दीन 'दिल्ली मोबाइल शॉप' या नावाने हे दुकान चालवतो. अथरुद्दीनने त्या पीडित मुलीचा मोबाईल नंबर घेतला. नंतर त्याने पीडितेला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

तसेच त्याने पीडितेवर मैत्री करण्यासाठी दबाव टाकला. तसेच स्वत: शीख (सरदार) असल्याची ही तो भासवत होता, असे पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान तो पीडितेचा कॉलेजमध्ये जाईपर्यंत पाठलाग करत असे. तसेच रस्त्यात त्याने पीडित मुलीचा विनयभंग करण्याचा ही प्रयत्न केला. पीडितेने अथरुद्दीनच्या या विनयभंगाच्या प्रयत्नाबद्दल आपल्या ओळखीच्या व्यक्तिला सांगितले. ज्यानंतर पीडित मुलगी आणि तो व्यक्ती तक्रार घेऊन अथरुद्दीनच्या दुकानात गेला. पंरतु याठिकाणी अथरुद्दीनने त्याच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर 'मी कोणाला घाबरत नाही', 'तुम्हाला जे करायचे ते करा' असे तो उद्धटपणे म्हणाला. तसेच पीडितेसह तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तिला जीवे मारण्याची धमकी त्याने दिलीय.

ज्यामुळे पीडित मुलगी घाबरली, असे तक्रारीत पीडितेच्या आईने सांगितले आहे. तसेच पीडितेच्या आईने आपल्या मुलीसोबत अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली आहे.पोलिसांना दिलेल्या तक्रारीत अथरुद्दीनवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी अथरुद्दीनला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

तसेच एका वृत्तसंस्थेने हल्द्वानीच्या बजरंग दलाचे कार्यकर्ता जोगिंदर सिंग राणा उर्फ ​​जोगी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी जोगिंदर यांनी सांगितले की, आरोपी अथरुद्दीन हा त्याच्या संपूर्ण कुटुंबासह हल्द्वानीच्या मुखानी रोडवर राहतो. तो पीडितेपेक्षा १०0वर्षांनी मोठा आहे. जोगिंदर राणा यांनी असेही सांगितले की अथरुद्दीनकडे दुकान चालवण्यासाठी वैध कागदपत्रेही नाहीत. अथरुद्दीनच्या मोबाईलमध्ये इतर अनेक हिंदू मुलींचे नंबर आणि त्यांच्याशी आक्षेपार्ह चॅटिंग केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.