मुलीच्या विनयभंगाला विरोध केला म्हणून मोहम्मदने केली पीडितेच्या आईची हत्या!

27 Apr 2024 17:09:32
Woman Shot Dead By Daughter's Lover For Opposing

नवी दिल्ली : मोहम्मदने आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीतील जहांगीरपुरी येथे सरिता शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केली. आफताब सरिता शर्मा यांच्या मुलीची छेड काढायचा. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही करण्यात आली होती. कुटुंबीयांना काही समजण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ एप्रिल २०२४ रोजी दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात असलेल्या जे ब्लॉकमध्ये आफताब आणि त्याच्या साथीदारांनी सरिता शर्मा नावाच्या महिलेच्या घरात घुसून तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. कुटुंबीयांनी जखमी महिलेला बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सरिता शर्मा यांनी आपल्या मुलीवर झालेल्या विनयभंगाचा विरोध केला म्हणून आफताबने तिची हत्या केली.



दरम्यान तक्रारीनंतर मोहम्मदने वारंवार त्याच्याविरुद्धची तक्रार मागे घ्या, अन्यथा जीवे मारेन, अशी धमकी पीडितेला दिला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळापासून काही अंतरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांच्या हालचाली कैद झाल्या असून, त्यात गुन्हेगार चेहरा लपवून टोप्या घातलेले दिसत आहेत.

मोहम्मद मेहताब आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, लवकरच पोलीस आफताब आणि त्याच्या साथीदारांना पकडतील, असे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सरिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी वेळीच मोहम्मद मेहताबवर कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती, असे कुटुंबीयांनी सांगितले.


 
 
Powered By Sangraha 9.0