भागभांडवलधारकांनी मंजूरी दिल्यावर स्विगीने आयपीओसाठी अर्ज केला ! ' इतक्या ' कोटींचा इश्यू आणणार

१०४०० कोटींचा इश्यू आणणार

    27-Apr-2024
Total Views |

Swiggy
 
 
मुंबई: स्विगी कंपनीचा आयपीओ बाजारात दाल होणार आहे. कंपनीने ३७५० कोटींचा निधी उभारणीसाठी ठरवले होते. कंपनीच्या भागभांडवल धारकांनी त्याला 'हिरवा' कंदील दाखवल्याने कंपनीने आयपीओची प्रक्रिया सुरू केली आहे.याशिवाय कंपनी ऑफर फॉर सेलमधून ६६६४ कोटी उभे करण्याचे ठरवले आहेत.
 
वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी अँकर (खाजगी) गुंतवणूकदारांकडून ७५० कोटी रुपये निधी जमावणार आहे. एप्रिल २३ तारखेला घेतलेल्या अनन्यसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रोसस कंपनीचा स्विगीत ३३ टक्के वाटा आहे.याशिवाय Tencent, DST Global, Qatar Investment Authority, Coatue, Alpha Wave Global, Invesco, Hilhouse Capital Group हे कंपनी महत्वाचे भागभांडवलधारक आहेत.
 
कंपनीने या १०४०० कोटींचा आयपीओ उभारण्यासाठी सेबीकडे अर्ज केला असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. याबद्दल अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. कंपनीने गुप्तपणे रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ड्राफ्टिंग करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अजून अंतर्गत माहिती समोर येऊ शकलेली नाही.