बलात्कार,धर्मांतर अन् गोमासं खाण्यास जबरदस्ती; साबीर खानने ओलांडली अत्याचाराची परिसीमा!

    27-Apr-2024
Total Views |
Sabir Khan raped girl in gwalior
भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये साबीर खानने एका तरुणीसोबत लव्ह जिहाद केल्याची घटना समोर आली आहे. साबीरने आधी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार सुरू केले.एवढेच नाही तर तो पीडितेवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत असे. साबीरने जबरदस्तीने गोमांस खाऊ घातल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तारागंज, ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेल्या २७ वर्षीय तरुणीने दि.२६ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी बहोदापूर पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. तरुणीने तक्रारीत सांगितले की, साबीर खान उर्फे छोटे खान नावाचा एक विवाहित व्यक्ति त्यांच्या घराजवळ राहतो. त्याने दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी तिच्याशी मैत्री केली. यानंतर त्याने पीडितेला आपल्या बोलण्यात अडकवले. दोघेही बोलू लागले. ही घटना घडली त्यावेळी साबीर खानचे लग्न झालेले नव्हते. मुलीने सांगितले की, साबीरचे लग्न झाल्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यानंतरही साबीरने तिचा छळ सुरूच ठेवला.

पीडितेने आरोप केला की, एके दिवशी साबीर खानने सांगितले की जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो आत्महत्या करेल आणि तिच्या वडील आणि भावाला अडकवेल. त्यामुळे घाबरलेल्या तरुणी खानशी जबरदस्तीने बोलू लागली. एके दिवशी त्याने तरुणीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले आणि आपल्यासोबत येण्यास सांगितले. तरुणीने नकार दिल्याने त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर तरुणीला त्याने आपल्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो तरुणीला ब्लॅकमेल करू लागला. अशाप्रकारे ब्लॅकमेल करत असताना साबीरने तिला स्वतःसोबत नेले आणि ३ वर्षांपासून तिचे शारीरिक शोषण सुरूच ठेवले. यादरम्यान साबीर तिला मारहाणही करायचा. तसेच तिच्यासोबत अनेकदा अनैसर्गिक कृत्यही केले.

पीडितेने सांगितले की, साबीर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असे. साबीर म्हणायचा, “जर तू माझ्यासोबत राहत असलीस तर तुला मुस्लमान व्हावे लागेल.” तरुणीचे म्हणणे आहे की, जेव्हा ती धर्मांतर करण्यास तयार नव्हती तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर एकदा तिला गोमांसही खाऊ घातलं होतं. तिने सांगितले की, साबीरचे वडील युसूफ खान आणि भाऊ समीर खान देखील तिला मारहाण करायचे. पीडित तरुणीचे म्हणणे आहे की, साबीर व्यतिरिक्त तिचे कुटुंबीयही तिला मारहाण करायचे. दि. २५ एप्रिलच्या रात्री साबीर खानची पत्नी आणि बहिणीने तिला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावेळी घरमालक तेथे गेला, त्यामुळे तिचे प्राण वाचले. मुलीने सांगितले की, या घटनेनंतर ती खूप घाबरली.

पीडितेच्या तक्रारीनंतर साबीर खानविरुद्ध बलात्कार, हल्ला, धमकावणे आणि धर्मांतरासाठी दबाव या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच साबीरच्या वडील आणि भावाविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मात्र साबीरसह तीनही आरोपी सध्या फरार आहेत. याप्रकरणी हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी बहोदापूर पोलीस ठाणे गाठून आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पीडितेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीचे घर पाडण्यात आले. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरमध्येही आरोपीचे घर पाडण्यात यावे, अशी मागणी हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.