'रामायण'च्या सेटवरील रणबीर-साई पल्लवीचा प्रभू श्रीराम-सीतेच्या भूमिकेतील लूक आला समोर

27 Apr 2024 17:38:25
दिग्दर्शक नितेश तिवारींनी 'रामायण'च्या सेटवर मोबाईल बंदी करुनही कलाकारांचे लूक होत आहेत व्हायरल.
 

ramayan  
 
मुंबई : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरुन अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या भूमिकेतील लूक समोर आला आहे. अतिशय प्रभावीपणे या भूमिका सांभाळताना (Sai Pallavi) दिसत असून त्यांचा हा लूक समोर आल्यानंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
 
नितेश तिवारींच्या 'रामायण' या चित्रपटातील आणखी काही कलाकारांचे देखील लूक यापुर्वी समोर आले होते. यात अरुण गोविल यांच्या राजा दशरथाच्या भूमिकेतील लूक आणि लारा दत्ता - शिबा चढ्ढा यांचाही लूक व्हायरल झाला आहे.
 
 
 
मात्र, अशाप्रकारे जर का 'रामायण' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच कलाकारांचे सेटवरील लूक समोर येत राहिले तर निर्मात्यांसाठी ही चिंतेची बाब ठरणार आहे. यापुर्वी समोर आलेल्या लूकमुळे रामायणच्या सेटवर मोबाईल बंदी दिग्दर्शकांनी केली होती. त्यामुळे आता नेमका याचा काय परिणाम होणार, लोकांच्या प्रदर्शनानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया असणारे हे येणारा काळच ठरवेल.
‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, लारा दत्ता, अरुण गोविल प्रमुख भूमिकेत असून यश आणि विजय सेतुपतीसुद्धा चित्रपटात झळकणार असे सांगितले जात आहे.
Powered By Sangraha 9.0