Q4 Results: दोन क्रमांकाची खाजगी बँक आयसीआयसीआय बँकेने तिमाही निकाल जाहीर केला बँकेचा निव्वळ नफा १०७०७ कोटींवर

संचालक मंडळाने प्रत्येक समभागावर १० रुपयांचा लाभांश सुचवला

    27-Apr-2024
Total Views |
 
icici bank
 
 
मुंबई: भारतातील क्रमांक २ ची खाजगी कंपनी आयसीआयसीआय बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर १७.४ टक्क्यांने निव्वळ नफा झाला आहे. कंपनीचा निव्वळ नफा १०७०८ कोटीवर गेला आहे.आर्थिक वर्ष २०२३ मध्ये निव्वळ नफा ९१२२ कोटी होता. बँकेला एकूण निव्वळ व्याजउत्पन्नात ८ टक्क्यांनी वाढ होत एकूण १९०९३ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील तिमाहीत हे उत्पन्न १७६६७ कोटी होते.
 
याशिवाय बँकेच्या एनपीए (Non Performing Assets) मध्ये घट झाली आहे. कंपनीच्या एनपीएत २.८१ टक्क्यांनी घट झाल्याने एनपीए २.१६ टक्क्यांवर पोहोचले आहे.बँकेच्या संचालक मंडळाने प्रति समभाग १० रुपयांचा लाभांश (Dividend) सूचवला आहे. याशिवाय संचालक मंडळाने एनसीडीमार्फत (Non Convertible Debentures) निधी उभारणीसाठी मंजुरी दिली आहे.