Q4 Results: बँक ऑफ महाराष्ट्राचा तिमाही निकाल जाहीर; बँकेला १२१८ कोटींचा निव्वळ नफा, व्याज उत्पन्नात १८ टक्क्यांनी वाढ

बँक ऑफ महाराष्ट्र एफपीओ किंवा क्यूआयपीमार्फत ७५०० कोटींचा निधी उभारणार

    27-Apr-2024
Total Views |

Bank of Maharashtra

 
मुंबई: बँक ऑफ महाराष्ट्राने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. बँकेला इयर ऑन इयर बेसिसवर ४५ टक्क्यांनी निव्वळ नफा ३१ मार्च २०२४ पर्यंत झाला आहे. बँकेचा एकूण नफा १२१८ कोटींवर पोहोचला आहे.आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (NII) मध्ये १८ टक्यांने इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच निव्वळ मार्जिनमध्ये ३.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
बँकेच्या एकूण इतर उत्पन्नात २४ टक्क्यांनी वाढ झाली असून हे उत्पन्न १०२२ कोटींवर पोहोचले आहे.बँकेच्या संचालक मंडळाने समभागावर १.४० रुपयांचा लाभांश द्यावा असा प्रस्ताव ठेवला आहे.यावर अंतिम निर्णय भागभांडवलधारकांच्या बैठकीत होऊ शकतो.बँकेच्या अँडव्हान्सेसमध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाली असून मार्च २०२४ पर्यंत ही संख्या २.०३ ट्रिलियन रूपयांवर पोहोचली आहे. बँकेच्या संचालकांनी म्हटल्याप्रमाणे बँकेला पुढील आर्थिक वर्षात १६ ते २० टक्क्यांनी अँडव्हान्समध्ये वाढ अपेक्षित आहे.
 
याशिवाय बँकेच्या एकूण ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२४ पर्यंत ही संख्या २.७० ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे. बँकेच्या कासा (CASA) ठेवीत चौथ्या तिमाहीत ५२.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.मागील तिमाहीत ही संख्या ५०.१९ टक्के होती. याशिवाय आगामी काळात बँक ऑफ महाराष्ट्र ७५०० कोटी रुपये एफपीओ आणि क्यूआयपीमार्फत वाढवण्यासाठी इच्छुक आहे. सध्या बँकेत केंद्र सरकारचे ८६ टक्के भागभांडवल बँक ऑफ महाराष्ट्रात आहे.