अल्पसंख्यांकांच्या बाबतीत काँग्रेसचे धोरण ढोंगीपणाचे : भाजपा आ. प्रविण दरेकर

    27-Apr-2024
Total Views |

Pravin Darekar 
 
मुंबई : अल्पसंख्यांकांच्या बाबतीत काँग्रेसचे धोरण ढोंगीपणाचे आहे, असा सणसणीत टोला भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार न दिल्याने नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला. यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शनिवारी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "अल्पसंख्यांकांच्याविषयी गळा घोटणाऱ्या काँग्रेसचे खरे चित्र समोर आले आहे. काँग्रेसने राज्यातील ४८ जागांमध्ये एकाही अल्पसंख्यांकांना जागा दिलेली नाही. त्याचा राग स्वाभाविकपणे नसीम खान यांना आहे. अल्पसंख्यांकांबाबतीतील काँग्रेसचे धोरण ढोंगीपणाचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर!
 
ते पुढे म्हणाले की, "शरद पवारांचा पक्ष केवढा आणि ते जागा किती लढवत आहेत? ते बारामतीतच घुटमळत आहेत आणि देशाच्या नेतृत्वावर बोलतात. देशातील नेतृत्व कुणाच्या हाती असावे हे देशातील जनता, मतदार ठरवत असते. बारामतीतील मतदार त्यांच्या मुलीने खासदार व्हावे की, नाही हे ठरवत आहे. देशवासियांचा सूर मोदींना पुन्हा नेतृत्व देण्याच्याच दिशेने आहे."
 
यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "संजय राऊत यांनी स्वतः काय काय वक्तव्य केलीत ती तपासून पाहावीत. छत्रपतींच्या वंशजांचे पुरावे मागणारी संजय राऊतांची औलाद आहे. पंतप्रधान मोदींनी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनेच गादीचा सन्मान केला आहे. तुम्ही गादीचा काय मान राखलात हे सगळे पाहत आहेत," असेही ते म्हणाले.