रेमंडच्या संचालकपदावरून नवाझ मोदी सिंघानिया यांची हकालपट्टी

27 Apr 2024 13:42:14

Nawaz Modi
 
 
मुंबई: गेल्या २ महिन्यापासून रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया व त्यांची पत्नी नवाझ मोदी यांच्या संघर्षाच्या बातम्या प्रसारमाध्यमात येत आहेत. आता नवाझ मोदी सिंघानिया यांची रेमंड उद्योग समुहाच्या तीन कंपन्या जे के इन्व्हेसटर,रेमंड कनज्यूमर केअर,स्मार्ट अँडव्हायजरी व फिनसर्व्ह या कंपन्यांच्या संचालक पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यापूर्वी नवाझ मोदी यांनी पती गौतम सिंघानिया यांच्यापासून ३१ वर्षांनंतर विभक्त होताना गंभीर आरोप गौतम सिंघानिया यांच्यावर केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे वृत्तसंस्थांशी बोलताना सांगितले होते.
 
उद्योग समुहाची नोंदणीकृत कंपनी रेमंड या कंपनीच्या संचालक मंडळातून त्यांची हकालपट्टी अधिकृतपणे करण्यात आलेली नाही परंतु इतर उपकंपन्यातून त्यांना पदावरून मुक्त केलेले आहे. मार्च ३१, २०२४ ला संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.२०१५ साली संचालक मंडळावर नवाझ मोदी सिंघानिया यांची नियुक्ती करण्यात आली होती. याविषयी प्रतिक्रिया देताना नवाझ मोदी यांनी गौतम सिंघानिया यांच्यावर बोलताना गंभीर आरोप केले होते.
 
कंपनीच्या भागभांडवलधारकांनी आपला नवाझ मोदी सिंघानिया यांच्यावर विश्वास राहिला नसल्याचा प्रस्ताव करत त्यांची हकालपट्टी करण्याचे आवाहन कंपनीकडे करण्यात आले होते. कंपनीच्या प्रवक्त्याने त्यांना संचालक मंडळातून काढून टाकण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

Powered By Sangraha 9.0