मोठी बातमी: भारत खेळण्यांच्या उत्पादनातही आत्मनिर्भर होणार चीनमधून आयातीत ७० टक्क्यांनी घट

देशात २०२८ पर्यंत खेळण्यांच्या व्यवसायात दुप्पट वाढ होणार

    27-Apr-2024
Total Views |

Toys
 
 
मुंबई: भारतातील औद्योगिक धोरणे मजबूत झाल्यानंतर आता खेळण्यांच्या आयातीत मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत देशातील सगळ्याच क्षेत्रातील उत्पादनात मोठी वाढ झाली. या धर्तीवर भारताच्या खेळण्यांच्या आयातीत लक्षणीय घट झालेली आहे.
 
यापूर्वी भारतात चीनमधून मोठ्या प्रमाणात खेळणी आयात केली जात होती. मात्र भारतातील योजनाबद्ध प्रयत्नांमुळे चीनमधील आयात होणाऱ्या खेळण्यात ७० टक्क्यांनी घट झाली आहे.'इन्व्हेस्ट इंडिया' या एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार,देशांतर्गत खेळण्यांचे बाजार १.५ अब्ज युएस डॉलर्सपर्यंत आहे.
 
या क्षेत्रात लहान व मध्यम प्रकारच्या खेळण्यांच्या उद्योगांचा समावेश आहे. त्यांनी आधारभूत धरलेल्या निकषानुसार भारतातील खेळणी उत्पादनात वाढ होत असताना खेळणी उद्योगाची उलाढाल आकडेवारीनुसार २०२८ पर्यंत दुप्पट वेगाने वाढण्याची शक्यता आहे.२०२२ ते २०२८ मध्ये ही वाढ सीएजीआर (CAGR) १२ टक्के राहिल असा अंदाज आहे.
 
केवळ उत्पादन वाढ नाही परंतु भारतातील खेळणी कंपन्या आपले उत्पादन परदेशी निर्यात करण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या मध्यपूर्वे, काही आफ्रिका देशात भारतातील उत्पादनांची (खेळण्याची) निर्यात सुरू झालेली आहे. कोविड काळानंतर भारताने स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या धोरणात मोठे बदल केले होते. आपल्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पार्टीने भारताला ' खेळण्यांचे हब' ( केंद्र) बनवण्याचे आश्वासन दिले आहे.यासाठी सरकारने ६० हून अधिक खेळण्यांचे प्रकल्प देशात सुरू केले आहेत.