मुंबई : मविआ सरकारच्या काळात मला कोणत्यातरी केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. माझ्या केसापासून पायापर्यंत माझी चौकशी करण्यात आली परंतु चौकशीअंती काहीच निष्पन्न झाले नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकार फडणवीसांना अटक करण्याची योजना आखली होती, असा गौप्यस्फोट एका मुलाखतीदरम्यान केला होता.
हे वाचलंत का? - पंतप्रधानांविषयी बेताल वक्तव्ये करणा-या राहुल गांधींना मतदार धडा शिकवतील!
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. ते रायगडमधील सभेत म्हणाले, माझी चौकशी करण्यासाठी त्यांनी काही अधिकारी नेमले, काही अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यातदेखील आले होते. तसेच, माझी चौकशीदेखील झाली. परंतु, त्यात त्यांना काहीच आढळलं नाही, असा आरोप फडणवीसांनी मविआवर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकारमधील नेत्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांना अटक करण्याची योजना आखण्यात आली होती. एका मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले होते.