राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात आतापर्यंत ३१.७७ टक्के मतदान

26 Apr 2024 15:16:58
loksabha election 2024 voting maharashtra



मुंबई :    लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सध्या देशभरात सुरू आहे. दरम्यान, राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. राज्यात आतापर्यंत सर्वांत कमी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात राज्यात ५५.२९ टक्के मतदान झाले होते. 

दरम्यान, राज्यात सकाळी ७ वाजल्यापासून आतापर्यंत ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. निवडणुक आयोगाकडून देशभरात मतदानाचा टक्का वाढण्याकरिता जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर मतदानाचा टक्का वाढावा याकरिता मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे. राज्यात आतापर्यंत सर्वांत कमी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात राज्यात ५५.२९ टक्के मतदान झाले होते.


हे वाचलंत का? -   राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झाले असल्याचे जाणकार सांगत आहेत. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त मतदान झालं होते. आता दि. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून मतदार आपला हक्क बजावताना दिसून येत आहेत. एकंदरीतच, मतदानानंतर फायदा कुणाला होणार हे दि. ०४ जून रोजी कळणार आहे.


दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :


वर्धा – ३२.३२ टक्के

अकोला -३२.२५ टक्के

अमरावती – ३१.४०टक्के

बुलढाणा – २९.०७ टक्के

हिंगोली – ३०.४६ टक्के

नांदेड – ३२.९३ टक्के

परभणी -३३.८८ टक्के

यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के



Powered By Sangraha 9.0