शरद पवारांचा ‘शपथनामा’ म्हणजे शुद्ध फसवणूक!

26 Apr 2024 17:58:16
bjp state president bawankule
 


मुंबई :      शरद पवार यांनी त्यांच्या उरल्या सुरल्या पक्षाचा ‘शपथनामा’ नावाचा जाहीरनामा ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते जनतेला मूर्ख समजत असून शरद पवारांचा शपथनामा हा खंजीर खुपसण्याचा नामा असल्याचा टोलादेखील बावनकुळेंनी लगावला.

ते म्हणाले, शरद पवार यांच्या या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही. जेव्हा-जेव्हा शरद पवार सत्तेवर होते तेव्हा-तेव्हा स्वतःच राजकारण, स्वतःच्या लोकांच राजकारण सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता यासाठी केले. या महाराष्ट्रच कधीच भले झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृवात्वात जो जाहीरनामा, वचननामा जाहीर केला आहे, त्यातून राष्ट्र कल्याण आणि देश कल्याण साधले जाणार असल्याचेही ते म्हणाले.


हे वाचलंत का? - विशाल पाटलांवर कारवाई व्हायला हवी होती : संजय राऊत


प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी (ठाकरे गट) नकली सेनेचा प्रकाशित झालेला वचननामा नसून 'यूटर्ननामा' आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागतंय. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे, अशी टीका ठाकरे गटावर बावनकुळेंनी केली.

ते पुढे म्हणाले, ज्यांची ओळख खंडणीखोर आणि १०० कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे ते म्हणतात आम्ही लूट थांबवू. अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात ज्यांनी शेतकऱ्यांना कवडीही दिली नाही, फक्त घरात बसून राहिले ते म्हणतायत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीच्या ‘यूर्टननाम्या‘ला भुलणार नसल्याचेही बावनकुळेंनी सांगितले.

एकनाथ खडसे यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेशाला कोणीही आडकाठी केली नाही, केंद्रानेच जर निर्णय घेतला आहे त्यामध्ये राज्य काही आडकाठी करत नाही. पक्ष प्रवेशाबद्दलची जी केंद्रीय समिती आहे ती अंतिम निर्णय घेते त्यानंतर समितीची बैठक झाल्यावर मग पक्ष प्रवेशाबद्दलचा निर्णय होईल. असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.
 
 



Powered By Sangraha 9.0