सोने चांदी भावात तुफान ! पुन्हा जबरदस्त वाढ

सोने प्रति १० ग्रॅम ४४० रुपयांनी व चांदी प्रति किलो २००० रुपयांनी महाग झाले

    26-Apr-2024
Total Views |

Gold
 
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमिश्र भावना असताना क्रूडसोबत सोन्यानेही आपली हजेरी लावली आहे.अमेरिकन बाजारातील सोन्याच्या मागणीत झाली आहे. अक्षय तृतीयेच्या नंतर पुन्हा एकदा सोने चढ्या भावाने नोंदवले गेले आहे.आज युएस सोने फ्युचर निर्देशांकात वाढ झाल्यावर आशिया बाजारातही सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. कालपर्यंत घसरलेले भाव पुन्हा वाढत सोने व चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत.
 
दुपारपर्यंत सोन्याच्या युएस फ्युचर स्पॉट दरात ०.६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स सोने निर्देशांकात ०.५८ टक्क्यांनी वाढ होत ७१६२४.०० पातळीवर वाढ झाली आहे. भारतातील सराफा बाजारात २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे ४४० रुपयांनी वाढ झाली आहे.
 
मुंबईतील २२ कॅरेट सोन्याच्या दरात १० ग्रॅम दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे.२४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ४४० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत चांदीच्या दरातही भारतात १ किलो दरात तब्बल २००० रुपयांनी वाढ झाली आहे.