स्मिता पाटील यांच्या चित्रपटाचा ४८ वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार प्रिमियर, बिग बींनी व्यक्त केला आनंद

    26-Apr-2024
Total Views |
अभिनेत्री स्मिता पाटील यांनी १९७४ ते १९८५ या कालावधीत अनेक नाटक आणि चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. शिवाय त्यांनी मराठीसह हिंदी, बंगाली, गुजराती या भाषांमध्येही कामं केली होती.
 

smita patil  
 
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील (Smita Patil). अतिशय कमी वर्षांच्या मनोरजंनाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अजरामर कलाकृती प्रेक्षकांच्या स्वाधीन केल्या. यापैकीच एक म्हणजे ‘मंथन’ चित्रपट. आनंदाची बाब म्हणजे तब्बल ४८ वर्षांनी ‘मंथन’ या चित्रपटाचा प्रिमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. हा फेस्टिव्हल १४ मे ते २४ मे का कालावधीत संपन्न होणार आहे.
 
स्मिता पाटील यांचं नाव घेतात समोर येतात त्यांचे बोलके डोळे. अभिनाची उत्तुंग उंची गाठलेल्या या अभिनेत्रीचा चित्रपट कान्समध्ये दाखवला जाणार असल्यामुळे पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना विशेष आनंद झाला आहे. त्यांनी सोशल मिडियावर त्याबद्दल आपल्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या. अमिताभ लिहितात, "फिल्म हेरिटेज फाउंडेशनला सलग तिसऱ्या वर्षी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपट दाखवण्याची संधी मिळत आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा श्याम बेनेगल यांचा चित्रपट 'मंथन'चा प्रिमियर होणार आहे. ज्यात स्मिता पाटील आणि इतर कलाकारांचा सुंदर अभिनय पाहायला मिळाला. फिल्म हेरिटेज फाऊंडेशन भारताच्या सर्वोत्तम चित्रपट वारशाचे जतन आणि हे चित्रपट जगासमोर प्रदर्शन करण्यासाठी करत असलेले कार्य आश्चर्यकारक आहे". दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत ‘नमक हलाल’, ‘गुलामी’, ‘शक्ती’ या चित्रपटांत काम केलं होतं.
 
 
 
स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'मंथन' चित्रपटात नसीरुद्दीन शाह, ओम पुरी यांच्याही महत्वपुर्ण भूमिका होत्या. तसेच, या चित्रपटाची एक विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी गुजरातमधील तब्बल ५ लाख शेतकऱ्यांनी प्रत्येकी २ रुपयांची मदत केली होती.